आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Parineeti & Ayushmann Launch Of Big TV Debut With Zee's 'Cinestars Ki Khoj

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सिनेस्टार की खोज'च्या लाँचिंग इवेंटमध्ये परिणीतीने घातली ग्लॅमरस लूकने भूरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅकलेस लूकमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा झी टीव्हीच्या 'झी सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. गुरुवारी या शोचा लाँचिंग इवेंट मुंबईत पार पडला. यावेळी परिणीतीसह अभिनेता आयुष्मान खुरानासुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाला होता. 'झी सिनेस्टार की खोज' हा कार्यक्रम अभिनयाशी निगडीत रिअॅलिटी शो असून झी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि विजय कृष्ण आचार्य या शोच्या परिक्षकाच्या खुर्चीत असतील. तर प्रसिद्ध टीव्ही अभिनेता हुसैन क्वाजेरवाला हा शो होस्ट करणार आहे. परिणीती शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या मेंटरची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.
या लाँचिंग इवेंटमध्ये परिणीती व्हाइट कलरच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिसली. तिचा हा ड्रेस बॅकलेस होता. तर दुसरीकडे आयुष्मान खुराना कॅज्युअल लूकमध्ये दिसला. यावेळी पटकथा
लेखक विजय कृष्ण आचार्य यांचीही उपस्थिती कार्यक्रमाला होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'सिनेस्टार की खोज' या शोच्या लाँचिंगवेळी क्लिक झालेली सेलेब्सची छायाचित्रे...