आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parineeti Chopra And Alia Bhatt To Appear On Koffee With Karan

आलिया - परिणीतीसोबत होणार ‘कॉफी विथ करण 4’ चा शेवट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कॉफी विथ करण 4’ च्या चौथ्या सीझनच्या शेवटी करण जोहर त्याचा आवडता मित्र शाहरुख खानला पाहुणा म्हणून कॉफी पिण्यास बोलावणार होता. मात्र असे झाले नाही.
सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण 4’चा चौथा सीझन याअगोदरच्या सीझनपेक्षा कितीतरी पटीने वेगळा राहिला आहे. आता या कार्यक्रमाचा शेवट होण्याची वेळ आल्याने या शेवटच्या एपिसोडमधील गेस्टवर सर्वाच्या नजरा टिकून आहेत. या शेवटच्या एपिसोडमध्ये करण शाहरुख खानला बोलावेल, असा तर्क लावला जात होता. कारण शाहरुख या शोमध्ये आजपर्यंत सहभागी झाला नव्हता. शाहरुखला तर या शोचा ब्रॅँड अँम्बेसेडर म्हटले जाते. मात्र या सर्व तर्कविर्तकांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण ‘कॉफी विथ करण’चा हा सीझन शाहरुखविना पूर्ण होणार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे.
शाहरुख खानजवळ सध्या वेळ कमी आहे. शिवाय सध्या तो ‘हॅपी न्यू इयर’ या आगामी चित्रपटाच्या क्लाइमॅक्सचे शूटिंग करत आहे त्यामुळे तो या शोमध्ये सहभागी होऊ शकत नाही. आता प्रश्न उरतो तो या शोच्या शेवटच्या भागात पाहुणे कोण असतील? तर या अंतिम शोसाठी करण जोहरने आलिया भट्ट आणि परिणीती चोप्राची निवड केली आहे. दोन नवे अॅक्टर्स ग्रॅँड फिनाले मध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आलिया शोच्या मागील सीझनमध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’या आपल्या चित्रपटाचे स्टारकास्ट सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनसोबत आलेली होती. मात्र परिणीतीचा या शोवरचा हा डेब्यू आहे. त्यामुळे दोन तरुण अॅक्टर्सना एकत्र पाहणे हे प्रेक्षकांसाठी एक गमतीदार असेल.