आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pavitra Rishta: Will Shilpa Agnihotri Replace Ankita Lokhande?

'पवित्र रिश्ता'मध्ये शिल्पा अग्निहोत्री घेणार अंकिता लोखंडेची जागा ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अर्चना अर्थातच अंकिता लोखंडे एक्झिट घेणार असल्याची चर्चा टीव्ही इंडस्ट्रीत रंगू लागली आहे.

'पवित्र रिश्ता' मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी अभिनेत्री शिल्पा अग्निहोत्रीला विचारणा करण्यात आली आहे. शिल्पा यापूर्वी 'कुसुम' आणि 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत झळकली होती.

शिल्पा मालिकेत अंकिताची जागा घेणार की, मालिकेत नवीन कॅरेक्टर दाखल करण्यात येत आहे, हे अद्याप गुलदस्त्याच ठेवण्यात आले आहे. मालिकेत सध्या सुरु असलेल्या ट्रॅकनुसार अर्चना कोमात आहे.

असे ऐकिवात आहे की, सततच्या शुटिंगमुळे अंकिताला मोठा ब्रेक मिळाला नाहीये. त्यामुळे दोन ते तीन महिने तिला मोठ्या सुटीवर जायचे आहे.

एकंदीतच आता अंकिताला सुटी हवी आहे म्हणून शिल्पा तिची जागा घेणार की, मालिकेत ट्विस्ट आणण्यासाठी नवीन कॅरेक्टर दाखल होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडीशी प्रतिक्षा करावी लागणार हे नक्की.