आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: बालपणी असा दिसायचा कॉमेडियन कपिल शर्मा, जाणून घ्या Personal आयुष्याविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(थोरले बंधू अशोक शर्मासोबत कपिल शर्मा)
मुंबईः 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक प्रसिद्ध शो आहे. कॉमेडियन कपिल शर्मा हा शो होस्ट करत आहे. कपिल छोट्या पडद्यावरील सर्वाधिक महागडा टीव्ही होस्ट ठरला आहे. रंगभूमीवरुन करिअरची सुरुवात करणा-या कपिलने आता यशोशिखर गाठले आहे. मात्र त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. रंगभूमीवर काम करत असताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आपल्या कठोर परिश्रम आणि चिकाटीमुळे तो यशोखिरावर पोहोचला.
divyamarathi.comच्या प्रतिनिधी किरण जैन यांनी कपिल शर्माच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी त्याच्या आई, शाळेच्या प्रिंसिपल आणि भावासोबत एक्सक्लूझिव्ह बातचित केली. सोबतच त्याच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रेसुद्धा जमवली. सादर आहे ही खास मुलाखत...
आईने प्रेमाने ठेवले टॉनी नाव...
कपिलची जन्म 2 एप्रिल 1981 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. त्याची आई त्याला प्रेमाने टोनी म्हणून बोलावते. त्याचे वडील जितेंद्र शर्मा पोलिस हवालदार होते, तर आई राणी गृहिणी आहेत. कपिलला दोन बहिणभावंड आहेत. भावाचे नाव अशोक शर्मा आणि बहिणीचे नाव पूजा शरमा आहे. कपिल 15 वर्षांचा असताना कॅन्सरमुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा तो दहाव्या वर्गात शिकत होता.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या कपिल शर्माच्या खासगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी आणि सोबतच पाहा खास छायाचित्रे...