आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी होती ही राहुलची \'दुल्हनिया\', PICS मध्ये पाहा डिंपीचा बिनधास्त अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- राहुल महाजन आणि डिंपी गांगुली)
मुंबईः टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या 'बिग बॉस'मध्ये शुक्रवारी डिंपी गांगुलीची एन्ट्री झाली आहे. चर्चेत कसे राहावे हे डिंपीला चांगलेच ठाऊक आहे. डिंपीच्या एन्ट्रीने शोचा टीआरपी वाढेल, अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
डिंपी राहुल महाजनची पत्नी आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल महाजनसोबत बिघडत चाललेल्या नात्यामुळे डिंपी प्रसिद्धीझोतात आली होती. डिंपीने राहुलवर मारहाण केल्याचा आरोप लावून त्याचे घर सोडले होते. मात्र राहुलने माफी मागितल्यानंतर ती घरी परतली होती. काही दिवस लोटत नाही तोच राहुल आणि डिंपीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. न्यायालयात घटस्फोटाची मागणी करणारा अर्जसुद्धा या दोघांनी दाखल केला आहे. बातमी आहे, की दुबईस्थित बिझनेसमनसोबत डिंपीच्या वाढत चालेल्या जवळीकमुळे राहुलसोबतचे तिचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे.
विभक्त झाले आहेत राहुल-डिंपी...
यावर्षी मे महिन्यात दोघांनी न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. अद्याप त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब व्हायचे आहे. यादोघांमधील वाद इतका एकोपाला गेला आहे, की दोघांचा घटस्फोट होणे निश्चित आहे. राहूलच्या एका मित्राच्या सांगण्यानुसार, 'दोघांचा घटस्फोट होणे निश्चित आहे. राहूलला निवडणूक संपण्याची प्रतिक्षा होती. दोघांचे नाते संपुष्टात आले आहे.'
कोण आहे डिंपी...
डिंपीचे माहेरचे आडनाव गांगुली आहे. 2010 मध्ये 'राहुल दुल्हनिया ले जाएंगे' या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये डिंपी सहभागी झाली होती. सर्व स्पर्धकांमध्ये डिंपीने बाजी मारत राहुलसोबत लग्न केले. राहुलच्या आयुष्यात पदार्पण करण्यापूर्वी डिंपीने मॉडेलच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली होती. लग्नानंतर डिंपीची काही खासगी छायाचित्रे इंटरनेटवर आली होती. ती छायाचित्रे बघून डिंपी बिनधास्त आयुष्य जगते, हे दिसून आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा डिंपी गांगुलीची खास छायाचित्रे...