आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal Life Pictures Of Bigg Boss 8 Contestant Karishma Tanna

भेटा \'Bigg Boss 8\'ची स्पर्धक करिश्मा तन्नाला, पाहा पर्सनल लाइफ Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- करिश्मा तन्ना)
मुंबई: टीव्ही आणि बॉलिवूड स्टार करिश्मा तन्ना 'बिग बॉस 8' या टीव्ही शोमध्ये सगभागी झालेली आहे. तिने एकता कपूरच्या 'क्योकी सास भी कभी बहू थी' या मालिकेत इंदू विरानीची भूमिका साकारली होती. मागील वर्षी 'ग्रँड मस्ती' बॉलिवूड सिनेमात झळकली होती. जाणून घेऊया तिच्या पर्सनल लाइफविषयी काही गोष्टी...
फॅशन ब्रँड 'लव्ह'ची ब्रँड अॅम्बेसडर
21 डिसेंबर 1983 रोजी मुंबई, महाराष्ट्रात जन्मलली करिश्मा सध्या भारताच्या फॅशन ब्रँड 'लव्ह'ची ब्रँड अॅम्बेसडर आहे. वॉशिंग पाउडर निरमा आणि स्टेफ्रीसारख्या जाहिरातीत करिश्मा झळकलेली आहे.
टीव्हीवर पहिले पाऊल
करिश्माने छोट्या पडद्यावर एकता कपूरच्या 'क्योकी सास भी कभी बहू थी' मालिकेतून पदार्पण केले. ही मालिका 2000पासून 2008दरम्यान प्रसारित झाली होती. 'क्योकी...'मधील तिच्या भूमिकेचे नाव इंदू विरानी होते. त्यामध्ये ती एक नटखट मुलगी होती. तिचे हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस केले होते. 'क्योकी...'व्यतिरिक्त 'कोई दिल मे है', 'रात होने को है', 'बाल वीर' आणि 'एक लडकी अनजानी सी'सारख्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे.
बॉलिवूडमध्ये एंट्री
टीव्हीसह करिश्माने बॉलिवूडमध्येसुध्दा नशीब अजमावले आहे. तिने 2005मध्ये 'दोस्ती: फ्रेंड्स फॉरएव्हर'मधून बॉलिवूडमध्ये आली. तिने 'आय एम सॉरी माथे बनी प्रीतसोनी' (2011, कन्नडी) आणि 'ग्रँड मस्ती' (2013)मध्ये अभिनय केला आहे. करिश्माचा 'टीना और लोलो' हा आगामी सिनेमा आहे. कदाचित यावर्षी हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करिश्मा तन्ना (सिंगल आणि फ्रेंड्स/सहका-यांसोबत)ची काही छायाचित्रे...