आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal Life Photos Of Bigg Boss Contestant Pritam Pyare

'...भाभी का शो'मुळे झाला फेमस, पाहा प्रीतमचे बालपणीपासून ते आत्तापर्यंतचे निवडक PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : प्रीतम प्यारे आणि त्याची पत्नी अमनजोत सिंह)
मुंबईः 1 फेब्रुवारी रोजी 'बिग बॉस'चा ग्रॅण्ड फिनाले रंगणार आहे. अलीकडेच प्रीतम प्यारेने टॉर्चर केज टास्क जिंकून फायनल राऊंडमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. प्रीतम एक रेडिओ जॉकी असून 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेण्यापूर्वीपर्यंत लोकांनी केवळ त्याचा आवाज ऐकला होता. या शोमध्ये आल्यानंतर लोकांनी केवळ त्याचा चेहराच बघितला नाही, तर तो हीरोच्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे.
"ग्यारह से दो भाभी का शो"...
प्रीतम एका प्रसिद्ध एफएम रेडिओवर रेडिओ जॉकी म्हणून काम करतो. अलीकडेच एफएम रेडिओने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. शिवाय 'बिग बॉस'च्या घरातदेखील त्याला सरप्राइज मिळाले होते. एफएमवरील "ग्यारह से दो भाभी का शो" हा त्याचा प्रसिद्ध शो आहे. या शोमध्ये तो 35 ते 45 या वयोगटातील महिलांसोबत रोचक गोष्टी करतो. रेडिओ करिअरमध्ये प्रीतमने आत्तापर्यंत राणी मुखर्जी, शाहरुख खानसह अनेक बड्या स्टार्सच्या मुलाखती घेतल्या आहेत.
निकनेम आहे विंकू..
प्रीतम प्यारेचे खरे नाव सर्वांना ठाऊक आहे. मात्र त्याचे नीकनेम फार कमी जणांना ठाऊक आहे. प्रीतमचे कुटुंबीय आणि मित्र त्याला विंकू या नावाने हाक मारतात. मुळ नागपूरचा असलेल्या प्रीतमच्या पत्नीचे नाव अमनजोत असून मुलाचे नाव आदित्य आहे. बिग बॉसच्या एका स्पेशल टास्कमध्ये प्रीतमची पत्नी आणि मुलगा सहभागी झाले होते. प्रीतमची पत्नी अमन प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रीतम प्यारेची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची खास छायाचित्रे...