(फाइल फोटो- मोहित मालिक आणि रेने ध्यानी)
मुंबई- 'बिग बॉस'मध्ये शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रात्री वाइल्ड कार्ड एंट्री झाली. सर्वात आधी रेने ध्यानीची एंट्री झाली आणि त्यानंतर डिंपल गांगुलीची झाली. डिंपल गांगुली भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची सून आणि राहूल महाजनची पत्नीच्या रुपात तिला ओळखले जाते.
रेने ध्यानीविषयी जास्त लोकांना माहित नाहीये. ती एमटीव्हीच्या लोकप्रिय 'रोडीज' शोच्या
आठव्या पर्वाची स्पर्धक म्हणून दिसली आहे.
नवी दिल्लीची रहिवाशी रेनेने राघव, राजीव आणि रणविजयला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते, की ती शॉर्ट टेम्पर्ड आहे. तिला खूप लवकर राग येतो. ती टास्क जिंकण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते.
या मुलाखतीत स्पष्ट दाखवण्यात आले होते, की शोमध्ये ती कशी ओळख निर्माण करू शकते. तिने 'रोजीड'मध्ये भरपूर शिवागाळचा वापर केला होता. मात्र, ती या शोमधून लवकर बाहेर आली. आता पाहणे रंजक ठरणार आहे, की 'बिग बॉस'मध्ये ती
आपल्या रागावर आणि शिवीगाळवर नियंत्रण ठेऊ शकते का?
रेनेचे फेव्हरेट्स
'बिग बॉस'च्या आतापर्यंतच्या स्पर्धकांमध्ये रेनेच्या फेव्हरेट्सविषयी सांगायचे झाले तर 4 पर्वात डॉली बिंद्रा आणि 6व्या पर्वात सेकंड रनरअप राहिलेला इमाम सिद्दीकी तिची आवडते स्पर्धक आहेत.
काय आहे रेने स्ट्रेटजी
रेने खूपच फटकळ स्वभावाची स्पर्धक आहे. या शोमध्ये स्ट्रेटेजी स्पष्ट आहे, की ती चांगल्यांसोबत चांगले आणि वाईट लोकांसोबत वाईटच वागेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिकस करून पाहा रेने ध्यानीच्या पर्सनल लाइफमधील छायाचित्रे...