आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal Life Photos Of Bua Of Comedy Nights With Kapil

लवकरच वयाची चाळीशी गाठणारेय 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मधील पिंकी बुआ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती नीरजसोबत पिंकी बुआ उर्फ उपासना सिंह)
मुंबईः टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री उपासना सिंहला लोक 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या पिंकी बुआच्या रुपात ओळखतात. शोमध्ये पिंकी बुआ 22 वर्षांची असल्याचे सांगत असते. शोच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत ही पिंकी बुआ सुयोग्य वराच्या शोधात आहे. हे तर झाले पिंकी बुआच्या रिल लाइफविषयी. मात्र तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाल्यास, पिंकी बुआचे खरे नाव उपासना सिंह असून ती विवाहित आहे आणि आनंदी वैवाहिक आयुष्य व्यतित करत आहे. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोने एक वर्षाचा लीप घेतला आहे. आता पिंकी बुआ, दादी बुआ होणारेय. कारण शोच्या फॉर्मेटनुसार, बिट्टू शर्मा उर्फ कपिल शर्मा आता लवकरच बाबा होणारेय.
एका मुलाखतीत उपासना सिंहने सांगितले होते, ''माझ्यात आणि पिकींत काहीही साम्य नाहीये. मी खूप रिजर्व आहे. माझा जन्म होशियापूरमधला आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीत मी लहानाची मोठी झाली. मोठ्यांचा आदर करणे, त्यांचे म्हणणे ऐकणे, हे संस्कार माझ्यावर झाले आहेत. कॉलेजातून थेट मी घरी यायचे. बाहेर कुठेही फिरण्याची परवानगी नव्हती. मला ठाऊक असायचे ही मुले माझा पाठलाग करत आहेत, मात्र कधीही रिअॅक्ट व्हायची माझी हिंमत झाली नाही.''
''कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोने माझी ओळखच बदलून टाकली. या कॅरेक्टरमुळे मी खरंच लग्नासाठी उत्सुक असल्याचे प्रेक्षकांना वाटते. माझ्या फेसबुक वॉलवर मला दररोज लग्नाची मागणी येत आहे. विचित्र पद्धतीने लग्नासाठी मागणी घातली जाते. यामध्ये 20 ते 60 वर्षे वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. एकदा एका मॉलमध्ये एका वयस्कर व्यक्तीने सर्वांसमोर मला लग्नाची मागणी घातली होती. ती व्यक्ती म्हणाली होती, की माझ्याशी लग्न कर, मी तुला नेहमी आनंदात ठेवील. त्यांना मला समजवावे लागले, की मी विवाहित असून माझ्या नव-याचे माझ्यावर खूप प्रेम आहे.''
जाणून घेऊया उपासनाविषयी आणखी काही खास गोष्टी...
शोमध्ये 22 वर्षांची आणि खासगी आयुष्यात 40 वर्षांची आहे 'पिंकी बुआ'...
शोमध्ये 22 वर्षे आपले वय सांगणारी पिंकी बुआ उर्फ उपासना खासगी आयुष्यात लवकरच वयाची चाळीशी गाठणार आहे. 29 जून 1975 रोजी पंजाबच्या होशियारपुर येथे तिचा जन्म झाला.
1986मध्ये पहिल्यांदा फेस केला कॅमेरा...
उपासनाला खरी ओळख ही छोट्या पडद्याने मिळवून दिली. मात्र तिने आपल्या करिअरची सुरुवात मोठ्या पडद्यावरुन केली होती. 1986 मध्ये 'बाबुल' या सिनेमात ती पहिल्यांदा झळकली होती. मात्र 1988 मध्ये रिलीज झालेला 'बाई चले सासरिये' हा राजस्थानी सिनेमा तिच्या करिअरमधील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. जवळजवळ 100 दिवस सिनेमा थिएटरमध्ये चालला. त्यानंतर पंजाबी, गुजराती आणि हिंदीत तिने काम केले.
गाजलेले सिनेमे...
'डर' (1993), 'लोफर' (1996), 'जुदाई' (1997), 'बादल' (2000), 'हमारा दिल आपके पास है' (2000), 'हां मैंने भी प्यार किया है' (2002), 'इश्क विश्क' (2003), 'हंगामा' (2003), 'मुझसे शादी करोगी' (2004), 'हलचल' (2004), 'एतराज' (2004), 'हमको दीवाना कर गए' (2006), 'गॉड तुस्सी ग्रेट हो' (2008) आणि 'गोलमाल रिटर्न्स' (2008)
गाजलेल्या मालिका...
'राजा की आएगी बरात' (2008-10), 'परी हूं मैं'(2008), 'मायका'(2007-09), 'मिसेज कौशिक की पांच बहुएं'(2011-13), 'सोनपरी' (2000-04), 'बाणी : इश्क द कलमा'(2013-14) आणि 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' (2002)
टीव्ही अभिनेत्यासोबत थाटला संसार...
उपासना सिंहचे लग्न टीव्ही अभिनेता नीरज भारद्वाजसोबत झाले. 2009 मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. 'दिल-ए-नादान' या मालिकेत काम करत असताना दोघांचे सूत जुळले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा पिंकी बुआचा वेगवेगळा अंदाज..