आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Real Life अशी आहे \'कॉमेडी नाइट्स\'ची दादी, पाहा फॅमिली-फ्रेंड्ससोबतचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी आणि मुलांसह 'कॉमेडी नाइट्स'ची दादी अर्थातच अली असगर)
मुंबई: 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या लोकप्रिय कॉमेडी शोने एक वर्षाचा लीप घेतला आहे. शोमध्ये आतापर्यंत दादीच्या भूमिकेत झळकणारा अली असगर आता आगामी एपिसोड्समध्ये परदादीची (पणजी) भूमिका वठवताना दिसेल. शोच्या फॉर्मेटनुसार, दादीचा नातू बिट्टू शर्मा (कपिल शर्मा) बाबा झाला आहे. दादीच्या भूमिकेतून प्रसिद्धी एकवटणारा अली असगर आता परदादी (पणजी)च्या भूमिकेतून प्रेक्षकांना काय नवीन दाखवणार याची उत्सकुता आहे.
अली असगरला या शोने एवढी लोकप्रियता मिळवून दिली, की लोक आता त्याला दादीच्या रुपातच ओळखू लागले आहेत. तसे पाहता अलीचा हा पहिला टीव्ही शो नाहीये. यापूर्वी तो 'कॉमेडी सर्कस'च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरलेला आहे. त्यानंतर 'कॉमेडी सर्कस'चा 'तानसेन' (2011) चा किताबही त्याने जिंकला होता. त्यामध्ये कपिल शर्मा त्याचा पार्टनर होता. यापूर्वीसुध्दा त्याने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. जाणून घेऊया त्याच्या खासगी आयुष्याविषयी...
1980मध्ये सुरु केले अॅक्टिंग करिअर...
अली असगरने 1987मध्ये दूरदर्शनच्या 'एक दो तीन चार' शोमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याचे वय केवळ 21 वर्ष होती. मात्र 2000-08मध्ये प्रसारित झालेल्या एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' मालिकेतून त्याला खरी ओळख मिळाली. या मालिकेत त्याने कमल अग्रवाल हे पात्र साकारले होते.
आतापर्यंत या शो आणि मालिकांमध्ये केले काम-
'एक दो तीन चार' (1987, दूरदर्शन)
'कहानी घर-घर की' (2000-08, स्टार प्लस)
'कुटुंब' (2001-03, सोनी टीव्ही)
'हम पांच' सीजन-2 (2006, झी टीव्ही)
'घर की बात है' (2008, एनडीटीव्ही, इमॅजिन)
'एफआयआर' (2009-11, सब टीव्ही)
'जीनी और जूजू' (2012-14, सब टीव्ही)
'कॉमेडी नाइट्स विद कपिल' (चालू आहे) कलर्स)
काही निवडक सिनेमांमध्ये दिसला आहे अली असगर
'हॉर्न ओके प्लीज' (2009), 'राज' (2002), 'जोश'(2000), 'जीना सिर्फ मेरे लिए'(2002), 'सन्डे' (2008), 'दिल विल प्यार व्यार'(2002), आणि 'परंपरा'(1992)सारख्या सिनेमामध्ये अली असगरने सहकलाकाराची भूमिका साकारली आहे.
खासगी आयुष्यात दोन मुलांचा आहे बाबा...
48 वर्षीय अली असगर खासगी आयुष्यात विवाहित आहे. 2005 मध्ये त्याचे लग्न झाले होते. सिद्दीका असगर हे त्याचा पत्नीचे नाव आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नुयान हे त्यांच्या मुलाचे तर अदा हे मुलीचे नाव आहे. अलीला आपला जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवायला आवडतो.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कुटुंबीय आणि मित्रांसह अली असगरच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे...