आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या बबितावर जेठालाल असतो नेहमी फिदा, खासगी आयुष्यात अशी आहे तिची अदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'तारक मेहता का उल्टा चश्मा’ या हास्य मालिकेने स्वत:चं एक वेगळं जग निर्माण केलं आहे. सब टीव्ही प्रसारित होणार्‍या मालिकेचा 28 जुलै 2008 रोजी सुरुवात झाली होती. 'तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये जेठालाल आणि दयाभाभीनंतर मिस्टर अय्यर व त्याची पत्नी बबिता अय्यर अर्थात मुनमुन दत्ता हिने मुख्य भूमिका साकारली आहे. बबिता मालिकेतील असे पात्र आहे, जिच्यावर जेठालाल नेहमी फिदा असतो. जाणून घेऊन बबिताविषयी बरेच काही...
बंगाली बाला आहे मुनमुन -
बबिता उर्फ मुनमुन दत्ता हिचा जन्म 23 सप्टेंबर 1987ला झाला. कोलकाता शहरातील मुनमुनही आतापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये तसेच अनेक मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसली आहे. मुनमुन दत्ता एक मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. परंतु मुनमुन हिने सब टीव्हीवरील या मालिकेत साकरलेली भूमिका ही तिच्या हॉट अंदाजाच्या एकदम विरुद्ध आहे.
तारक मेहता...मुळे मिळाली खरी प्रसिद्धी-
मुनमुन दत्ता हिला खरी ओळख ही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने मिळवून दिली. मुनमुन हिने यात कृष्णन अय्यरची पत्नी बबिता अय्यरची भूमिका साकारली आहे. याची जोडी जरा हटकेच आहे. कृष्णन हा रंगाने सावळा तर बबिताही खूप गोरी आहे. मालिकेत जेठालाल नेहमी बबितासोबत फ्लर्ट करताना दिसतो.
रुपेरी पडद्यावर झळकली-
मुनमुन दत्ता ही 2006 मध्ये आलेल्या ‘हॉलिडे’या चित्रपटात झळकली होती. दिग्दर्शक महेश भट्‍ट यांनी 'हॉलिडे'ची निर्मिती केली होती. पाकिस्तान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची खूप वाह वाह झाली होती. डीनो मारिया आणि कश्मीरा शाह यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
'जेठालाल'सोबत आहे जुने नाते..
तसे पाहिले तर जेठालाल आणि बबिता यांची ओळख फार जुनी आहे. बबिता अर्थात मुनमुन दत्ता आणि जेठालाल अर्थात दिलीप जोशी यांनी यापूर्वी ‘हम सब बाराती’ या मालिकेत सोबत काम केले होते.
वाद आणि नखरे -
मुनमुनला कोणी स्पर्श केलेले चालत नाही. या कारणावरून शूटिंगदरम्यान तिचे अनेकाशी भांडण होते. मुनमुनच्या स्वभावामुळे तिला अनेक निर्मात्यांनी काम देणे बंद केले आहे. मुनमुन हिने यात कृष्णन अय्यरची पत्नी बबिता अय्यरची भूमिका साकारली आहे. याची जोडी जरा हटकेच आहे. कृष्णन हा रंगाने सावळा तर बबिताही खूप गोरी आहे. त्यामुळे बबिताला ही भूमिका साकारण्यावर आक्षेप होता. तिचे नखरे इथेच संपत नाही. मालिकेत होळी खेळण्याच्या एक शॉट होता. यामध्ये गोकुलवासी एकमेकांना रंग लावतात. मात्र हा शॉट करण्यासाठी मुनमुनने स्पष्ट नकार दिला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बबिता उर्फ मुनमुनची खासगी आयुष्यातील छायाचित्रे...