आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाइफमध्ये असा आहे 'जेठलाल'च्या 'बबिताजी'चा अंदाज, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- मुनमुन दत्ता)
मुंबई: छोट्या पडद्यावर प्रसारित होणारी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही कॉमेडी मालिका 17 सप्टेंबरला 1500 एपिसोड्स पूर्ण करत आहे. सब टीव्हीवर दाखवली जाणारी या मालिकेची सुरुवात 28 जुलै 2008 रोजी झाली होती. आतापर्यंत कोणत्याही कलाकाराने ही मालिका सोडलेली नाहीये.
मालिकेत जेठालाल आणि दया भाभीसुध्दा मिस्टर अय्यर आणि त्याची पत्नी बबिता अय्यर अर्थातच मुनमुन दत्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र, आम्ही तुम्हाला आज मुनमुनविषयी सांगणार आहोत. मुनमुन मालिकेत मिस्टर अय्यरच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. मालिकेत जेठालाल बबितावर नेहमी फिदा असतात. चला जाणून घेऊया तिच्याविषयी काही रंजक गोष्टी...
बंगाली बाला आहे मुनमुन-
या बंगाली बालाचा जन्म 23 सप्टेंबर 1987 रोजी कोलकाता येथे झाला. मुनमुन आतापर्यंत अनेक टीव्ही चॅनल आणि मासिकांच्या कव्हर पेजवर झळकली आहे. मुनमुन दत्ता एक मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. 'तारक मेहता...'मधील पात्र तिच्या पर्सनॅलिटीच्या विरुध्द आहे.
'तारक मेहता...'ने मिळाली ओळख-
मुनमुन 2006मध्ये आलेल्या 'हॉलिडे' सिनेमात झळकली होती. या सिनेमाची दिग्दर्शिक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट होती. या सिनेमाची पाकिस्तान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बरीच प्रशंसा झाली असती. सिनेमाची मुख्य कलाकार डिनो मारिया आणि करिश्मा शाह होती. मात्र, मुनमुनला खरी ओळख 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतूनच मिळाली आहे. मालिकेत ती कृष्णन अय्यरची पत्नी बबिताच्या भूमिकेत आहे. कृष्णनचा रंग सावळा आणि मुनमुनचा रंग गोरा आहे. यांची जोडी मालिकेत खूपच कॉमेडी रुपात दाखवली आहे.
जेठालालशी खूप जूने नाते आहे-
जेठालाल आणि बबिता यांचे नाते खूप जूने आहे. बबिता अर्थातच मुनमुन दत्ता आणि जेठालाल अर्थातच दिलीप जोशी या मालिकेपूर्वी 'हम सब बाराती' मालिकेत झळकले होते.
वाद आणि नखरे
मुनमुनशी एख वाद जोडलेला आहे. सांगितले जाते, की तिला फिजीकल टच आवडत नाही. शूटिंगदरम्यान जर फिजिकल टचचा एखादा शॉट आला, की चिडते. तिच्या या सवयीने दिग्दर्शकांनी तिला अनेक एपिसोडमधून आउट केले आहे. तरीदेखील मुनमुन तिच्या या सवयीवर ठाम आहे.
मालिकेत कृष्णनचा रंग सावळा आणि तिच्या रंग गोरा आहे. सुरुवातीला मुनमुनला ही भूमिकाला बरीच अचडण निर्माण झाली. मात्र तिने ही भूमिका केली. या मालिकेत एक शॉट होळीचा होता. सर्व कलाकार एकमेकांना रंग लावणार होते. मात्र मुनमुनने या शॉटसाठी नखरे दाखवले असे सांगितले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बबिता अर्थातच मुनमुन दत्ताच्या खासगी आयुष्यातील काही छायाचित्रे, ज्यामध्ये ती फोटोंमध्ये सिंगल तर काहींमध्ये बॉलिवूड स्टार्ससह दिसत आहे...