आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal Life Pics Of Begum Ruqaiya From \'jodha Akbar\'

\'जोधा अकबर\'ची \'बेगम रुकैय्या\'चा स्टाइलिश आणि बिनधास्त अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐतिहासिक पाश्वभूमिवर आधारित 'जोधा अकबर' ही झी टीव्हीची मालिका दिवसेंदिवस लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी ठरत आहे. या शोमध्ये रजत टोकस अकबरची भूमिका तर परिधी शर्मा जोधाची भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त शोमध्ये आणखी एक रुकैय्या बेगमचे मुख्य पात्र आहे. अकबरच्या मुख्य बेगमच्या पात्राला साकारणा-या लवीना टंडनविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लवीनाने एक बालकलाकार म्हणून काम केले आहे
लवीनाला आज सर्वजण 'जोधा अकबर'च्या मालिकेमुळे ओळखत असले तरी ती बालपणापासून टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे. लवीना 13 वर्षांची असताना अरुणा ईराणी यांच्या 'तुम बिन जाऊ कहा' या टीव्ही शोपासून तिने बालकलाकारच्या भूमिकेला सुरूवात केली होती. 2005मध्ये तिने 'हीरो: भक्ती ही शक्ती है'मध्ये शेर्लोटची भूमिका वठवली होती. याव्यतिरिक्त 2006मध्ये तिने रजत टोकसची मुख्य भूमिका असलेल्या 'धरती का वीर योध्दा पृथ्वीराज चौहाण'मध्ये चमकीची भूमिका केली होती.
स्माइल सूरीनंतर लवीना बनली रुकैय्या बेगम
लवीनाने 'पापड पोल...' आणि 'बालवीर' या सब टीव्हीच्या शोमध्ये आणि 'एक हजारो मे मेरी बहना है' या स्टार प्लसच्या मालिकेत अभिनय केला आहे. जुलै 2013मध्ये तिला 'जोधा अकबर'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. यावेळी रुकैय्या बेगमची भूमिका स्माइल सूरीने प्रकृती खालावल्याने शो सोडला होता. तेव्हा तिच्याऐवजी लवीनाला या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.
टीव्हीवर रुकैय्या बेगमच्या रागीट आणि चतुर स्वभावाला तुम्ही रोजच बघता. परंतु रिअल लाइफमध्ये ती खूपच कूल आणि स्टाइलिश आहे.
चला एक नजर टाकूया रुकैय्या बेगम अर्थातच लवीना टंडनच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रांवर, पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा लवीनाचे काही UNSEEN PICS...