आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal LIfe Pics Of Daya Bhabhi Aka Disha Vakani

रिअल लाइफमध्ये विवाहित नाहीये \'दया भाभी\', पाहा खासगी आयुष्यातील PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सब टीव्हीवर प्रसारित होणारा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील दया भाभीला सर्वच ओळखतात. ही मालिका जेवढी लोकप्रिय आहे, तेवढीच लोकप्रिय या मालिकेत लीड रोल साकारणारी अभिनेत्री दया जेठालाल उर्फ दिशा वाकाणी आहे. तिचे चाहते तिला गरबा क्वीन म्हणूनही ओळखतात. छोट्या पडद्यावर दया भाभीचे संस्कार, डान्स आणि जेठालालसोबतची तिची धमाल मस्ती तुम्ही पाहिली आहे, मात्र आज आम्ही तुम्हाला तिच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत...
गुजरातमध्ये झाला जन्म -
1997पासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिशा वाकाणीचा जन्म 17 सप्टेंबर 1978 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. मात्र ती लहानाची मोठी भावनगरमध्ये झाली. शालेय जीवनात असतानाच तिची अभिनयात रुची वाढली. तिने अहमदाबाद येथील गुजरात कॉलेजमधून ड्रॅमेटिक आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.
ख-या आयुष्यात विवाहित नाहीये दया भाभी -
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालालची पत्नी आणि टप्पूच्या आईची भूमिका साकारणा-या दिशाने खासगी आयुष्यात अद्याप लग्न केलेले नाही. ती 35 वर्षांची असून योग्य वराच्या शोधात आहे. आता ती मुंबईत वास्तव्याला आहे.
सिनेमातही केला आहे अभिनय -
दिशा वाकाणी केवळ टीव्ही मालिकांमध्येच नव्हे तर रुपेरी पडद्यावरही झळकली आहे. 'कमसिन : द अनटच्ड' (1997), 'फूल और आग' (1999), 'देवदास' (2002), 'मंगल पांडे : द राइजिंग' (2005), 'सी कंपनी' (2008) आणि 'जोधा अकबर' (2008) या सिनेमांमध्ये दिशाचा अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे.
'तारक मेहता...' मालिकेमुळे मिळाली खरी प्रसिद्धी -
2008 पासून दिशा वाकाणी सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कौटुंबिक मालिकेत काम करत आहे. या मालिकेमुळे दिशाला खरी ओळख प्राप्त झाली. या मालिकेपूर्वी दिशाने खिचड़ी' (2004) आणि 'इंस्टेंट खिचड़ी' (2005) या मालिकांमध्ये काम केले होते. या दोन्ही मालिकांमध्ये ती पाहुण्या कलाकाराच्या रुपात झळकली होती. दिशाने आत्तापर्यंत दहाहून अधिक टेली अवॉर्ड्स आपल्या नावी केले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा दया भाभी उर्फ दिशा वाकाणीची खासगी आयुष्यातील खास छायाचित्रे...