आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Bossमध्ये गौहर खानच्या बहिणीची होणार एन्ट्री, पाहा खासगी आयुष्याची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः निगार खान)
मुंबईः बिग बॉसच्या मागील पर्वाची विजेती गौहर खान हिची बहीण निखार खान लवकरच या शोमध्ये एन्ट्री घेणार असल्याचे समजते. बातमी आहे, की बिग बॉसच्या निर्मात्यांनी गौहर खानसोबत एक करार केला असून वाइल्ड कार्डच्या माध्यमातून तिचा घरात प्रवेश होणार आहे. निगार खान छोट्या पडद्यावरील चर्चित चेहरा असून मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्टच्या रुपात तिला ओळखले जाते.
एक नजर टाकुया तिच्या खासगी आयुष्यावर...
पुण्यात झाला जन्म...
निखार खान मुंबईत वास्तव्याला आहे. मात्र तिचा जन्म 2 मे 1979 रोजी पुण्यात झाला. 2002पासून ती टीव्ही इंडस्ट्रीशी जुळली आहे. काही महिन्यांपूर्वी बातमी आली होती, की दुबईत वास्तव्याला असेलल्या एका पाकिस्तानी बिझनेसमनसोबत निगार लग्न करणार आहे.
2002 मध्ये मिळाला मोठा ब्रेक..
निगार खानला 2002 मध्ये झी टीव्ही वाहिनीवरील 'लिपस्टिक' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत तिने शीतल सिंघानिया नावाच्या तरुणीचे पात्र साकारले होते. त्यानंतर ती अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली. निगारला निगेटीव्ह भूमिकेसाठी ओळखले जाते. यावर्षी निगार सब वाहिनीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत योगा टीचरच्या भूमिकेत झळकली होती.
निगारच्या निवडक मालिका...
इंडिया कॉलिंग (2005-2006), 'कसम से' (2007), 'मितवा : फूल कमल के' (2009-2010), 'सावित्री' (2013) आणि 'बुद्ध' (2013)
पुढील स्लाईड्समध्ये पाहा निगार खानची निवडक छायाचित्रे...