(फाइल फोटो : सुशांत सिंह राजपूत और अंकिता लोखंडे)
मुंबई - टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे अलीकडेच पोटदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला दहा दिवसांचा विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अंकिता सध्या झी टीव्ही वाहिनीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मेन लीडमध्ये झळकत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता आजारी पडल्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी स्क्रिप्टमध्ये बदल घडवून आणले आहेत. जेणेकरुन अंकिताच्या अनुपस्थितीत मालिकेच्या प्रसारणावर त्याचा परिणाम जाणवणार नाही.
छोट्या पडद्यावरची सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अंकिता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ('काई पो छे' आणि 'शुद्ध देशी रोमांस' या सिनेमांमध्ये झळकला आहे.)ची गर्लफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर आहे. जाणून घ्या अंकिताविषयीच्या काही खास गोष्टी..
इंदोरमध्ये झाला जन्म...
अंकिताचा जन्म 19 डिसेंबर 1984 मध्ये इंदोरमधील एका मराठी कुटुंबात झाला. 2005मध्ये शिक्षण संपल्यानंतर अभिनयात करिअर करण्यासाठी ती मुंबईत दाखल झाली. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला साथ मिळाली ती झी टीव्हीच्या इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज या कार्यक्रमाची. 2008 मध्ये अंकिता पहिल्यांदा अभिनय करताना छोट्या पडद्यावर दिसली होती.
पहिली मालिका प्रसारित होऊ शकली नाही...
2008मध्ये 'इंडियाज बेस्ट सिने स्टार की खोज' या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अंकिताला एनडीटीव्ही इमॅजिनच्या 'बाली उमर को सलाम' या मालिकेत लीड रोल मिळाला, मात्र काही कारणास्तव ती मालिका प्रसारित होऊ शकली नव्हती. या मालिकेत तिच्या अपोझिट 'संस्कार : धरोहर अपनों की' फेम जय
सोनी होता.
'पवित्र रिश्ता'मुळे मिळाली प्रसिद्धी...
अंकिताची पहिली मालिका प्रसारित होऊ शकली नाही, मात्र 2009मध्ये तिला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या गाजत असलेल्या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. या मालिकेत तिच्या पात्राचे नाव अर्चना देशमुख आहे. 2013 पासून अंकिता या मालिकेत दुहेरी भूमिका साकारत आहे. तिच्या दुस-या पात्राचे नाव अंकिता नरेन कर्माकरक असे आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री...
अंकिताच्या नावी अद्याप एकच मालिका आहे. मात्र या एकाच मालिकेने तिला टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री बनवले आहे. मालिकेला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे अंकिता महागडी अभिनेत्री ठरली आहे. प्रॉडक्शन हाऊसच्या सूत्रानुसार, अंकिता एका एपिसोडसाठी 90 हजार ते 1.15 लाख रुपये मानधन घेते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सुशांत सिंह राजपूतसोबतची अंकिताची काही निवडक छायाचित्रे...