आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal Life Pics Of Sandhya From Diya Aur Bati Hum

PICSमध्ये पाहा 'दीया और बाती हम'मधील संध्याचा खास अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सून लवकरच रिअल लाइफमध्ये कुणाची पत्नी बनणार आहे. आम्ही बोलतोय ते 'दीया और बाती' या लोकप्रिय मालिकेतील संध्या अर्थातच अभिनेत्री दीपिका सिंहविषयी. अलीकडेच बातमी आली आहे, की या शोचे दिग्दर्शक रोहित राज गोयलसह दीपिका बोहल्यावर चढणार आहे. येत्या मे महिन्यात लग्न करणार असल्याचे स्वतः दीपिकाने स्पष्ट केले आहे. दीपिकाचे रोहितसोबत लव्ह कम अरेंज मॅरेज आहे.
'दीया और बाती'मधील संध्याची भूमिका...
स्टार प्लस वाहिनीवरील 'दीया और बाती' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेत दीपिका मुख्य भूमिकेत आहे. आयपीएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणा-या संध्या नावाच्या तरुणीची भूमिका दीपिकाने या मालिकेत साकारली आहे.
दीपिकाचे खासगी आयुष्य...
24 वर्षीय दीपिकाचा जन्म 26 जुलै 1989 रोजी दिल्लीत झाला होता. पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीतून बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये दीपिकाने मास्टर डिग्री (MBA) मिळवली. मात्र करिअरच्या रुपात तिने अभिनय क्षेत्राची निवड केली. दीया और बाती हम ही दीपिकाच्या करिअरमधील पहिलीच मालिका आहे. 2011मध्ये ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली होती. तेव्हापासून सुरु झालेला मालिकेचा हा प्रवास आजही सुरु आहे. शिवाय मालिकेची लोकप्रियतासुद्धा कायम आहे. दीपिकाच्या कुटुंबीयांनी दिग्दर्शक रोहित राज गोयलला तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नात पाहिले होते. तेथेच त्याला पसंतही केले होते. रोहितच्या कुटुंबीयांनीसुद्धा त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आहे.
divyamarathi.comकडून दीपिकाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा दीपिकाची खास छायाचित्रे...