आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal Life Pics Of Saurabh Raaj Jain Krishna Of 'Mahabharat'

भेटा महाभारतातील श्रीकृष्णाला, पाहा खासगी आयुष्याचे निवडक Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून 'महाभारत' मालिकेतील श्रीकृष्णाच्या भूमिकेत आणि उजवीकडे पत्नी रिद्धिमा त्रिसाल सौरभ राज जैन)
मुंबई - स्टार प्लस वाहिनीवरील 'महाभारत' या गाजलेल्या पौराणिक मालिकेने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अभिनेता सौरभ राज जैन श्रीकृष्णाच्या भूमिकेत झळकला होता. सौरभची ही पहिली पौराणिक मालिका नव्हती. यापूर्वी 'जय श्रीकृष्णा' आणि 'देवों के देव महादेव' या दोन पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या मालिकांमध्ये झळकला आहे. त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. जाणून घ्या सौरभविषयी बरेच काही...
नवी दिल्लीत झाला जन्म...
सौरभचा जन्म 1 डिसेंबर 1981 रोजी नवी दिल्लीत झाला. येथील सी एस के एम बोर्डिंग स्कूलमधून त्याने आपल्या शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्लीतीलच इन्द्रप्रस्थ युनिव्हर्सिटीमधून त्याने उच्चशिक्षण घेतले. याशिवाय पुण्यातील सिम्बॉयसिस इंटरनॅशन युनिव्हर्सिटीमधून त्याने एमबीएची पदवी प्राप्त केली. सौरभचे लग्न झाले असून त्याच्या
पत्नीचे नाव रिद्धिमा त्रिसाल आहे.
2004 मध्ये केले छोट्या पडद्यावर पदार्पण...
सौरभने 2004 मध्ये स्टार वन वाहिनीवरील 'रिमिक्स' या गाजलेल्या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत त्याच्या भूमिकेचे नाव अमनदीप असे होते. एक वर्ष त्याने या मालिकेत काम केले. त्यानंतर 2006 मध्ये 'कसम से' या मालिकेत रोहित चोप्रा नावाच्या तरुणाची भूमिका त्याने साकारली. 2008 मध्ये पहिल्यांदा तो 'जय श्रीकृष्णा' या पौराणिक मालिकेत विष्णुच्या भूमिकेत झळकला. त्याने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. सध्या तो लाइफ ओके वाहिनीवरील 'देवों के देव महादेव' या मालिकेत भगवान विष्णूच्या भूमिकेत दिसत आहे. याचवर्षी त्याला महाभारत या मालिकेसाठी पहल नई सोच की आणि रिश्ता नई सोच का या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
सौरभच्या आत्तापर्यंतच्या मालिका...
रीमिक्स (स्टार वन, 2004-2005)
कसम से (झी टाव्ही, 2006-2009)
मीत मिला दे रब्बा (सोनी 2008)
जय श्रीकृष्णा (कलर्स, 2008-2009)
यहां मैं घर-घर खेली (झी टीव्ही, 2009)
परिचय (कलर्स, 2011)
चिंटू, चिंकी और एक बड़ी सी लव स्टोरी (सब टीव्ही, 2011)
देवों के देव...महादेव (लाइफ ओके, 2011-सतत)
उतरन (कलर्स, 2012)
महाभारत (स्टार प्लस, 2013-2014)
(नोट : देशभराता श्रीकृष्ण जयंतीच्या सणाची धूम सुरु आहे. यानिमित्ताने divyamarathi.com तुम्हाला छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'महाभारत' (2013-2014) या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणा-या सौरभ राज जैनच्या खासगी आयुष्याची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.)
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सौरभ राज जैनची निवडक खासगी छायाचित्रे...