आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: लाडक्या अक्षराने 27व्या वर्षांत केले पदार्पण, पाहा ग्लॅमरस अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून लोकप्रिय झालेली हिना खान आज प्रत्येक घरा-घरात अक्षरा नावाने ओळखली जाते. अक्षराचा आज वाढदिवस असून तिने वयाच्या 27व्या पदार्पण केले. अक्षरा पडद्यावर खूपच सोज्वळ आणि साधी दिसते. अंगभर दागिने- साडी आणि हळूवार स्वरात बोलणारी अक्षरा प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे.
मात्र, तिची मुख्य भूमिका असलेली 'ये रिश्ता क्या कहलाता' मालिका लवकरच डबाबंद होण्याच्या मार्गावर आहे. यामागे कारण सांगितले जाते, की सततच्या घसरत चाललेल्या टीआरपीमुळे निर्मात्यांनी ही मालिका डबाबंद करण्याचा निर्णय घेतला. अद्याप याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही.
कोण आहे हिना -
हिनाला प्रेक्षक 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अक्षराच्या रुपात ओळखतात. 2009मध्ये सुरु झालेल्या या मालिकेत हिना मेन लीडमध्ये आहे. या मालिकद्वारेच हिनाने आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. 2 ऑक्टोबर 1987 रोजी श्रीनगरमध्ये जन्मलेली हिना अभिनेत्रीसोबतच एक मॉडेलसुद्धा आहे.

अफेअरमुळेसुद्धा आली चर्चेत...

हिना खानला टीव्ही इंडस्ट्रीत जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढीच ती खासगी आयुष्यातसुद्धा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी हिना खान शोचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जयंत जायस्वालसोबत डेट करत असल्याची बातमी आली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेटवर रॉकीच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या जयंत आणि हिनाच्या नात्याविषयी सर्वांनाच ठाऊक आहे, मात्र अद्याप दोघांनी आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबूली दिलेली नाहीये.

तसे पाहता हिनाच्या अफेअरची चर्चा होत असल्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी या शोचे दिग्दर्शक नीरज बालियासोबत तिचे नाव जुळल्याची बरीच चर्चा होती. मात्र स्वतः हिनाने आपल्या अफेअफची बातमी अफवा असल्याचे म्हटले होते. रंजक गोष्ट म्हणजे नीरज आणि हिनाच्या ब्रेकअपच्या बातम्या मीडियात आल्या होत्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा हिना खान अर्थातच अक्षराच्या बर्थडे निमित्त तिच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे...