आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'उतरन\'च्या तपस्याचा खास अंदाज, बघा रश्मी देसाईचे खासगी PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी लिपोसक्शन सर्जरी केल्याची बातमी अलीकडेच आली होती. रश्मीने मात्र ही बातमी खोटी असून लिपोसक्शन नव्हे, तर पित्ताशय सर्जरी केल्याचे स्पष्ट केले आहे. रश्मी देसाई टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 2006 मध्ये तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याकाळात ती ब-याच टीव्ही मालिकांमध्ये झळकली. उतरन या मालिकेमुळे रश्मीला खरी प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली तपस्या ठाकूरची भूमिका प्रचंड गाजली.
खरे नाव दिव्या देसाई -
आसाममधील नागांव येथे एका गुजराती कुटुंबात 4 ऑगस्ट 1986 रोजी रश्मीचा जन्म झाला. रश्मीचे खरे नाव दिव्या देसाई आहे. ती केवळ एक कुशल अभिनेत्रीच नव्हे, तर उत्कृष्ट डान्सरसुद्धा आहे. रश्मीने कत्थक आणि भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. अभिनेत्रीबरोबरच मॉडेलच्या रुपातही रश्मीला ओळखले जाते.
या मालिकांमध्ये केले काम -
रश्मीला खरी प्रसिद्धी 'उतरन' (2008 पासून सुरु) या मालिकेमुळे मिळाली, मात्र यापूर्वी ती झी टीव्हीवरील रावण (2006) या मालिकेत मंदोदरीच्या भूमिकेत झळकली होती. याशिवाय 'परी हूं मैं' (2008, स्टार वन), 'मीत मिला दे रब्बा' '(2008-2009, सोनी टीव्ही) आणि 'श्श्श्श...फिर कोई है' (2008, स्टार वन) या मालिकांमध्येसुद्धा झळकली आहे. याशिवाय 'कॉमेडी का महामुकाबला', 'कहानी कॉमेडी सर्कस की' आणि 'कॉमेडी सर्कस 3' या कॉमेडी मालिकांमध्येही तिने काम केले आहे.
सिनेमांमध्येही आजमावले नशीब -
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या रश्मीने बॉलिवूडमध्येही आपले नशीब आजमावले आहे. सलमान खान आणि शाहरुख खानसह तिने स्क्रिन शेअर केली आहे. 2004 मध्ये शाहरुख खान आणि रवीना टंडन स्टारर 'ये लम्हे जुदाई के'मध्ये आणि 2013मध्ये सलमान खान स्टारर 'दबंग 2'मध्ये ती झळकली आहे. बॉलिवूडशिवाय आसामी आणि भोजपूरी सिनेमांमध्येही रश्मी झळकली आहे.
लग्नाच्या वर्षभरातच नव-यापासून विभक्त -
रश्मीने 2011मध्ये उतरनमधील को-स्टार नंदीश संधूसोबत लग्न केले. दोघांनी राजस्थानमधील धौलपूर येथे लग्न केले होते. मात्र लग्नाच्या वर्षभरातच दोघांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाल्याच्या बातम्या मीडियात आल्या. इतकेच नाही तर रश्मीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्याचेही ऐकिवात आहे. याशिवाय रश्मीने आपल्या नावापासून नव-याचे आडनाव काढून टाकले आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा रश्मी देसाईची काही खासगी छायाचित्रे...