आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी आयुष्यात अशी आहे 'कॉमेडी नाइट्स'ची 'दादी', पाहा रिअल लाइफ Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पत्नी आणि मुलांसह 'कॉमेडी नाइट्स'ची दादी अर्थातच अली असगर)
मुंबई: टीव्ही अभिनेता अली असगरला आज सर्वाधिक ओळख 'कॉमेडी नाइट्स...'मधील दादीच्या रुपात मिळाली आहे. हा त्याचा पहिला टीव्ही शो नाहीये. तो 'कॉमेडी सर्कस'च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरलेला आहे. त्यानंतर 'कॉमेडी सर्कस'चा 'तानसेन'सुध्दा (2011) त्याने जिंकला होता. त्यामध्ये कपिल शर्मा त्याचा पार्टनर होता. यापूर्वीसुध्दा त्याने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. जाणून घेऊया त्याच्या खासगी आयुष्याविषयी...
1980मध्ये सुरु केली अभिनयाला सुरुवात:
अली असगरने 1987मध्ये दूरदर्शनच्या 'एक दो तीन चार' शोमधून त्याने करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी त्याचे वय केवळ 21 वर्ष होती. मात्र 2000-08मध्ये प्रसारित झालेल्या एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' मालिकेतून त्याला खरी ओळख मिळाली.
आतापर्यंत या शो आणि मालिकांमध्ये केले काम-
'एक दो तीन चार' (1987, दूरदर्शन)
'कहानी घर-घर की' (2000-08, स्टार प्लस)
'कुटुंब' (2001-03, सोनी टीव्ही)
'हम पांच' सीजन-2 (2006, झीटीव्ही)
'घर की बात है' (2008, एनडीटीव्ही, इमॅजिन)
'एफआयआर' (2009-11, सबटीव्ही)
'जीनी और जूजू' (2012-14, सबटीव्ही)
'कॉमेडी नाइट्स विद कपिल' (चालू आहे) कलर्स)
काही निवडक सिनेमांमध्ये दिसला आहे अली असगर
'हॉर्न ओके प्लीज' (2009), 'राज' (2002), 'जोश'(2000), 'जीना सिर्फ मेरे लिए'(2002), 'सन्डे' (2008), 'दिल विल प्यार व्यार'(2002), आणि 'परंपरा'(1992)सारख्या सिनेमामध्ये अली असगरने सहकलाकाराची भूमिका साकारली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कुटुंबीय आणि मित्रांसह अली असगरच्या खासगी आयुष्यातील छायाचित्रे...