आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिषाची \'Bigg Boss\'मधून एक्झिट, पाहा तिची खासगी आयुष्यातील छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- क्रिकेटर एंड्रयू सायमंडसोबत मिनिषा लांबा)
मुंबई: पूर्ण 6 आठवड्यांपर्यंत 'बिग बॉस'च्या घरात राहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा अखेर घराबाहेर आली आहे. या आठवड्यात तिला घरातून एक्झिट घ्यावी लागली. आर्य आणि तिच्याविषयी काही बातम्या समोर आल्यानंतर ती चर्चेत आली होती. मात्र, दोघांनी नंतर आपसात साम्यंजस्याने सोडवणूक केली. घराबाहेर आल्यानंतर मिनिषाला घरातील कोणत्याच सदस्याविषयी तक्रार नव्हती. जाणून घेऊया मिनिषा लांबाच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी...
हरियाणा फॅमिलीमधून आहे मिनिषा
मिनिषा एका हरियाणा कुटुंबातील आहे. तिचा जन्म 18 जानेवारी 1985 रोजी नवीन दिल्लीमध्ये झाला होता. मिनिषाच्या वडिलांचे केवल आणि आईचे नाव मंजू आहे. तिला एक धाकटा भाऊदेखील आहे. त्याचे नाव करण आहे. मिनिषाने चेत्तीनाद विद्याश्रम शाळा, चेन्नई आणि मिरांडा हाऊस यूनिव्हर्सिटी, दिल्लीमधून शिक्षण घेतले.
शिक्षणादरम्यान सुरु केली मॉडेलिंग...
मिनिषा दिल्ली यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होती, त्यावेळी तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. तिने सोनी, एलजी, कॅडबरी, एअरटेल आणि सनसिल्कसारख्या प्रसिध्द ब्रँड्सच्या जाहिराती केल्या आहेत.
जाहिराती करताना मिळाला सिनेमा
कॅडबरीच्या जाहिरातीचे शूटिंग करताना तिला दिग्दर्शक सुजित सरकारने आपल्या 'यहा' सिनेमाची ऑफर दिली. हा सिनेमा 2005मध्ये रिलीज झाला आणि मिनिषाला त्यासाठी फिल्मफेअर बेस्ट फिमेल डेब्यू अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आले.
'बचना ए हसीनो'मधून मिळाली ओळख
मिनिषा 'यहा'नंतर 'कॉर्पोरेट', 'अथोनी कौन है', 'हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'दस कहानिया'सारखे अनेक सिनेमांत सहायक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. परंतु तिला खरी ओळख 2008मध्ये रिलीज झालेल्या 'बचना ए हसीनो' सिनेमातून मिळाली. या सिनेमात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, बिपाशा बसुचीसुध्दा. महत्वाची भूमिका होती. मिनिषाने सिनेमात माहीचे पात्र साकारले होते. तिचा 'हंगामे पे हंगामा' हा आगामी सिनेमा येत असून 2015 रिलीज होणार असल्याचे सांगितल्या जाते.
या सिनेमांत साकारल्या भूमिका...
किडनॅप (2008)
वेल डन अब्बा (2010)
पंजाबी सिनेमांसुध्दा केले काम...
मिनिषाने हिंदीसोबत पंजाबी, कानडी सिनेमांत काम केले आहे. पंजाबीमध्ये तिने 'हीरो और हीरो' (2013) आणि 'डबल दी ट्रबल' सिनेमांत काम केले आहे. तसेच, ती 'कॉन्ट्रॅक्ट' (2011) या एका कानडी सिनेमात दिसली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मिनिषाच्या लाइफमधील काही निवडक छायाचित्रे...