आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 8: रिअल लाइफमध्ये बिनधास्त आहे सुकिर्तीचा अंदाज, पाहा खास Pix

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सुकिर्ती कांडपाल)
मुंबईः टीव्ही अभिनेत्री सुकिर्ती कांडपाल रविवारी 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडली. या घरातून बाहेर पडणारी सुकिर्ती दुसरी स्पर्धक आहे. यापूर्वी म्हणजे 27 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये सोनाली राऊतला एलिमिनेट करण्यात आले होते. मात्र बिग बॉसच्या ट्विस्टमुले तिचे घरात पुनरागमन झाले आहे. प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर गेल्या आठवड्यात सुकिर्ती आउट झाली. जाणून घ्या सुकिर्तीविषयी...

BPO मध्ये केले होते काम...
20 नोव्हेंबर 1987 रोजी उत्तराखंड येथील नैनीतालमध्ये जन्मलेल्या सुकिर्तीने मुंबईतील सोफिया कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी ती इंटरनॅशनल BPOमध्ये कामाला होती.
'दिल मिल गए' मालिकेमुळे मिळाली ओळख...
सुकिर्तीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख स्टार वन वाहिनीवरील 'दिल मिल गए' या मालिकेमुळे मिळाली. 2007 ते 2010 या काळात ही मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेत तिने डॉ. रिद्धिमा गुप्ताची भूमिका साकारली होती. काही दिवसांनी शिल्पा आनंदने सुकिर्तीला रिप्लेस केले होते.
चर्चित मालिकाः
'दिल मिल गए', 'प्यार की ये एक कहानी', 'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' आणि 'हमने ली है शपथ'
अफेअर्समुळे राहिली प्रकाशझोतात...
बिग बॉस 8च्या सुरुवातीच्या काळात सुकिर्ती आणि उपेन पटेल यांच्यात जवळीक वाढलेली दिसली. मात्र नंतर तिची मैत्री आर्य बब्बरसोबत झाली. या शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी सुकिर्ती अफेअर्समुळे चर्चेत राहिली. मात्र सर्व अफवांना ब्रेक लावत तिने जाहिर केले, की एका नॉन फिल्मी बॅकग्राउंडच्या ऋषभ जैन नावाच्या तरुणासोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे.
'दिल मिल गए' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान सुकिर्तीचे नाव करण सिंह ग्रोवरसोबत जुळले होते. मात्र नंतर करणने जेनिफर विंगेटसह लग्न केले. बातम्यांनुसार, सुकिर्तीचे नाव मनोज रायसिंघानी नावाच्या तरुणासोबतसुद्धा जुळले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बिग बॉस 8मधून बाहेर पडलेल्या सुकिर्ती कांडपालची खासगी आयुषाची खास छायाचित्रे...