(फाइल फोटो- कृतिका सेंगर)
मुंबई: टीव्ही अभिनेत्री कृतिका सेंगर आता मिसेस धीर झाली आहे. बुधवारी (3 सप्टेंबर) ती 'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमात थंगाबलीचे पात्र साकारलेल्या निकितन धीरसोबत लग्नगाठीत अडकली. कृतिका झीटीव्हीवर प्रसारित झालेल्या 'झांसी की रानी लक्ष्मीबाई' या ऐतिहासिक मालिकेत राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसली होती. जाणून घेऊया तिच्याविषयी अशाच काही रंजक गोष्टी...
कानपूरमध्ये झाला जन्म
कृतिकाचा 3 जुलै 1986 रोजी कानपूर उत्तर प्रदेशमध्ये जन्म झाला. तिने कानपूरच्या मेथोडिस्ट हाय स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. दिल्लीच्या एमिटी यूनिव्हर्सिटीमधून तिने पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी तिने मुंबई गाठली.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी जाहिरात एजेन्सीसाठी करत होती काम
कृतिकाला लोक आज टीव्ही अभिनेत्री म्हणून ओळखत असले तरी ती या क्षेत्रात येण्यापूर्वी जाहिरात एजेन्सीमध्ये काम करत होती. टीव्हीवर पहिलीच भूमिका तिला 'क्योकी सास भी कभी बहू थी' (2007-08) मालिकेत मिळाली.
'झांसी की रानी'मधून मिळाली ओळख-
कृतिकाने छोट्या पडद्यावर अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. परंतु तिला खरी ओळख 2010-2011मध्ये प्रसारित झालेल्या 'झांसी की रानी' मालिकेतून मिळाली. या मालिकेत तिने लक्ष्मीबाईची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने झीटीव्हीवर 'पुर्न
विवाह' मालिकेतूनसुध्दा प्रसिध्दी मिळवली.
आतापर्यंत या मालिकांमध्ये केले काम-
कसौटी जिंदगी की (2007-08)
क्या दिल मे है (2008)
किस देश मे है मेरा दिल (2009, कॅमियो)
एक वीर कि अरदास वीरा (2014, कॅमियो)
देवो के देव...महादेव (2014)
नोट- कृतिकाने 'माय फादर गॉड फादर'मधून मोठ्या पडद्यावर एंट्री करणार आहेत. पंजक धीर दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कृतिका सेंगरच्या पर्सनल लाइफमधील काही निवडक छायाचित्रे...