आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: \'कॉमेडी नाइट्स..\'चे 8 पात्र, यांच्यामुळे सुपरहिट आहे शो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बातमी आहे, की टीव्हीवरील लोकप्रिय शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' एक वर्षासाठी लीप घेत आहे. शोमध्ये नवीन संकल्प आणि स्वरुप आणण्यासाठी 'कॉमेडी नाइट्स...'चे निर्माते काही बदल शोमध्ये करणार आहेत. लवकरच तुम्ही नवीन टि्वस्ट आणि टर्न्ससोबत विनोदांनी भरलेला हा शो तुमच्या भेटीस येईल.
जून 2013मध्ये कलर्स वाहिनीवर प्रसारित झालेल्या या शोला देशातच नव्हे परदेशातसुध्दा पसंती मिळाली. दिवसेंदिवस शोची लोकप्रियता वाढत गेली. शोचे स्टार्स आणि स्टार्सचे प्रसिध्द डायलॉग याची यूएसपी मानले जातात. होस्ट कपिल शर्मा कधी बिट्टू शर्मा तर कधी बाबाच्या भूमिकेत दिसला, मात्र त्याला प्रेक्षकांनी पसंत केले.
कपिलसोबत अली अजगर (दादी), सुमोना चक्रवर्ती (मंजू शर्मा), उपासना सिंह (बुआ), सुनिल ग्रोव्हर (गुत्थी), किकू शारदा (पलक) या सर्व पात्रांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांचे डायलॉग्स सामान्य माणसांच्या आयुष्यात दररोज वापले जाणारे असतात. या प्रसिध्द डायलॉगमधील बिट्टू शर्माचा प्रसिध्द डायलॉग 'बाबाजी का ठुल्लू' आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'कॉमेडी नाइट्स...'च्या स्टारकास्ट आणि त्यांचे प्रसिध्द डायलॉग्स...