आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी अशी दिसायची दिव्यांका त्रिपाठी, उराशी बाळगले होते आर्मी ऑफिसरचे स्वप्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका त्रिपाठी - Divya Marathi
दिव्यांका त्रिपाठी
मुंबई: दिव्यांका त्रिपाठी 8 जुलैला विवेक दाहियासोबत लग्न करत आहे. भोपाळमध्ये तिच्या लग्नाच्या विधी सुरु झाल्या आहेत. सर्वांना ठाऊक आहे, की भोपाळमध्येच दिव्यांकाचा जन्म झाला आणि येथेच तिचे बालपण गेले. दिव्यांकाच्या सांगण्यानुसार, ती बालपणी टॉमबॉय होती. कुणी कल्पनासुध्दा करू शकत नव्हते, की पुढे चालून ती सुंदर अभिनेत्री होईल. एका मुलाखतीदरम्यान, तिने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला होता.
काय म्हणाली होती दिव्यांका...
दिव्यांकाने सांगितले होते, 'माझ्या मुलीसारखे काहीच नव्हते. आईच्या हाताने शिवलेले कपडे परिधान करत होते. माझ्या एका कानाला छिद्र होते आणि घालण्यासाठी लूज शर्ट आणि ट्राऊजर. मला वाटायचे, की मी माझ्या वडिलांची नकल करतेय.'
आर्मी ऑफिसर व्हायचे होते...
14 डिसेंबर 1984ला जन्मलेल्या दिव्यांकाने कधी विचारदेखील केला नव्हता, की ती टीव्ही शोमध्ये काम करेल. एकेकाळी ती आर्मी ऑफिसर व्हायचे स्वप्न पाहत होती. आई-वडील दोघेही एनसीसी कॅडेट होते. म्हणून दिव्यांकासुध्दा अनेक वर्षे एनसीसी कॅडेट होती. तिथे तिने बंदूक चालवणेसुध्दा शिकली. ती शाळेच्या रेंजमध्ये निशाणा लावण्याचा सराव करत होती. अनेक गोल्ड आणि सिल्वर मेडल जिंकले होते. शिवाय तिला हॉर्स रायडिंग आणि स्किइंगचासुध्दा शौक आहे.
आईने वाढवले धैर्य...
दिव्यांकाच्या सांगण्यानुसार, एकदा भोपाळमध्ये एका फॅशन स्पर्धा होती. दिव्यांकाची आई तिला म्हणाली, 'तुझ्याकडे इव्हिनिंग गाऊन आहे तर तुही सहभाग घे.' दिव्यांकाला मुलांसारखे कपड परिधान करायची सवय होती. त्यामुळे तिला गाऊन परिधान करण्यास लाज वाटत होती. आईने सांगितल्यानंतर तिने होकार दिला आणि गाऊन घातला. तेव्हा तिला जाणीव झाली, की रफ अँड टफ चेह-यामागे एक सुंदर चेहरा दडलाय.
वडील चालवतात मेडिकल स्टोर...
दिव्यांकाचे वडील भोपाळमध्ये मेडिकल स्टोर चालवतात. कुटुंबात आईशिवाय एक बहीण आणि भाऊसुद्धा आहे. तिचे आईवडीलसुद्धा एनसीसी कॅडेट होते. येथेच तिच्या आईवडिलांची भेट झाली, प्रेम जडले आणि दोघांनी लग्न केले. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दिव्यांकासुद्धा एनसीसीमध्ये सहभागी झाली. येथे ती बेस्ट कॅडेट ठरली होती.
रायफल शूटिंगमध्ये ठरली बेस्ट...
आर्मी ऑफिसरचे स्वप्न बघणा-या दिव्यांकाला ड्राइंग, स्कॅचिंग, सिंगिंग आणि डान्सची विशेष आवड आहे. दुरदर्शनवरील काही कार्यक्रमांमध्ये तिने भाग घेतला होता. ती अभ्यासातही हुशार आहे. शालेय शिक्षण घेत असताना तिने रायफल शूटिंगचे ट्रेनिंग घेतले होते. तिची आजही रायफल शूटिंगमधील रुची कायम आहे. भोपाळमध्ये आल्यानंतर ती आवर्जुन शूटिंग रेंजवर जात असते.
'इंडियाज बेस्ट सिनेस्टार'पासून सुरु झाले करिअर...
2004 मध्ये झी टीव्ही वाहिनीवरील 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार' या कार्यक्रमाद्वारे दिव्यांकाने आपल्या करिअरची सुरुवात केली. या टॅलेंट शोमध्ये भाग घेण्यासाठी ती भोपाळहून दिल्लीत आली होती. येथे सूपर मॉडेल्सना बघून तिचा आत्मविश्वास डगमळला होता. मात्र तरीदेखील ती या टॅलेंट शोमध्ये सहभागी झाली. येथे तिला मिस ब्युटीफूल स्किनचा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर तिने मिस भोपाळचा किताब आपल्या नावी केला. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तिला मुंबईतील कॉल येणे सुरु झाले. एकेदिवशी शकुंतलम फिल्म्सकडून तिला ऑडिशनसाठी फोन आला. ऑडिशनच्या आठवड्याभरानंतर तिची निवड झाल्याचे तिला कळवण्यात आले. 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेत तिला लीड रोल मिळाला. सध्या दिव्यांका स्टार प्लसवरील 'ये हैं मोहब्बतें' या मालिकेत लीड रोल साकारत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांकाचे बालपणीपासून ते आतापर्यंतचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...