आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षांचे झाले 'कमोलिका'चे Twins, शेअर केले बर्थडे सेलिब्रेशनचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्षितिज आणि सागरसोबत उर्वशी ढोलकिया - Divya Marathi
क्षितिज आणि सागरसोबत उर्वशी ढोलकिया
मुंबई: 'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत कमोलिकाचे पात्र साकारलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने (36) मंगळवारी (21 जून) सागर आणि क्षितीज या जुळ्या मुलांचा 21वा बर्थडे सेलिब्रेट केला. उर्वशीने सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये या फोटो ती दोन्ही मुले, आई-वडील आणि क्लोज फ्रेंड्ससोबत बर्थडे पार्टी एन्जॉय करत आहे.
वयाच्या 16व्या वर्षी लग्न, 18व्या वर्षी झाला घटस्फोट...
छोट्या पडद्यावरील नावाजलेल्या उर्वशीने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी लग्न केले होते. तर 17 व्या वर्षी ती जुळ्या मुलांची आई झाली. मुलांच्या जन्मानंतर म्हणजेच वयाच्या 18व्या वर्षी तिचा नव-यासोबत घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी उर्वशीने सांभाळली आहे.
कमी वयात लग्न आणि घटस्फोट यामुळे उर्वशीच्या पर्सनल लाईफमध्ये अनेक चढउतार आलेत. मात्र प्रोफेशनल लाईफमध्ये ती यशोशिखरावर राहिली. उर्वशीने भरतनाट्यममध्ये प्राविण्य मिळवले आहे. 'घर एक मंदिर', 'कभी सौतन कभी सहेली', 'कही तो होगा'सारख्या मालिकांमध्ये काम केलेली उर्वशी 'बिग बॉस सीजन 6'ची विजेती आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा उर्वशीच्या जुळ्या मुलांच्या बर्थडे सेलिब्रेशनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...