आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: DID Super Momsच्या सेटवर माधुरी, गोविंदासोबत धरला ताल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डीआयडीच्या मंचावर ताल धरताना माधुरी दीक्षित आणि गोविंदा)
मुंबईः बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आणि गोविंदा नुकतेच एका मंचावर ठुमके लावताना दिसले. 'डीआयडी सुपर मॉम्स'च्या सेटवर या दोघांच्या नृत्याची जुगलबंदी बघायला मिळाली. या शोमध्ये माधुरी आपल्या ऑनलाइन डान्स अकॅडमीच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी माधुरीने गोविंदा आणि इतर परीक्षकांसोबत भरपूर धमाल मस्ती केली.
माधुरी आणि गोविंदाची जोडी 1998 मध्ये रिलीज झालेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमातील 'मखना...' या गाण्यात दिसली होती. 'मखना...' या गाण्याचे मॅजिक ब-याच वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना यावेळी बघायला मिळाले. याशिवाय माधुरीने 'डेढ इश्किया' या सिनेमातील गाण्यावरसुद्धा यावेळी ताल धरला होता. शोचे जज गीता कपूर आणि स्पर्धकांसोबत माधुरीने ठुमके लावले. 'डीआयडी सुपर मॉम्स'चा माधुरी स्पेशल एपिसोड येत्या रविवारी रात्री 9 वाजता झी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'डीआयडी'च्या मंचावर पोहोचलेल्या माधुरीची खास छायाचित्रे...