आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss: PHOTOS Of Ajaz Khan’S Dream House And Candid Moments

Inside Photos: हे आहे Bigg Bossचा Ex स्पर्धक एजाजचे स्वप्नातील घर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस'चे आठवे पर्व आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचले आहे. सातव्या पर्वात सहभागी झालेला मॉडेल आणि अभिनेता एजाज खानला या पर्वातही संधी देण्यात आली होती. शोच्या 'हल्लाबोल' या सीरीजमध्ये चॅलेंजरच्या रुपात एजाजची एन्ट्री बिग बॉसच्या घरात झाली होती. मात्र अली मिर्जासोबतच्या भांडणामुळे एजाजला लवकरच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एजाजचे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकला आहे, मात्र खासगी आयुष्यात तो कुटुंबाला प्राधान्य देणारी व्यक्ती आहे.
divyamarathi.com शी केलेल्या खास बातचीतमध्ये एजाजने आपल्या खासगी आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या. आपल्या घराशी अनेक आठवणी जुळल्या असल्याचे त्याने या मुलाखतीत सांगितले. तो म्हणाला, "माझे एक छोटेसे कुटुंब आहे. माझ्या कुटुंबात आई, पत्नी आणि माझ्या गोंडस मुलाचा समावेश आहे. आई माझी ताकद असून मी तिचा खूप सन्मान करतो. तिने आयुष्यात बराच संघर्ष करुन जगातील सर्व आनंद मला देण्याचा प्रयत्न केला. माझी पत्नी एंड्रिया माझा कणा आहे. मी माझ्या प्रोफेशनल आयुष्यात काय करतोय, यात ती कधीच ढवळाढवळ करत नाही. एंड्रिया नेहमी माझ्या निर्णयाला पाठिंबा देते. या दोन्ही स्त्रियांना माझ्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यांच्याशिवाय माझे आयुष्य पूर्ण होत नाही."
एजाज खानला दोन वर्षांचा एक मुलगा आहे. आपल्या मुलाविषयी तो सांगतो, "माझा एक गोंडस मुलगा असून त्याचे नाव अलेक्झेंडर आहे. तो माझे नशीब आणि हृद्याची धडधड आहे. जेव्हापासून तो आमच्या आयुष्यात आला, तेव्हापासून आमचे नशीबच पालटले आहे. मला आयुष्यात काम, पैसा, प्रसिद्ध सर्वकाही मिळाले. माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व आहे."
मुंबईत एजाजचे स्वप्नातील घर आहे. दोन वर्षांपूर्वी एजाजने आपले स्वप्नातील घर खरेदी केले. घराविषयी तो सांगतो, "आम्हाला हे घर घेऊन दोन वर्षे झाली आहेत. या घराशी अनेक आठवणी जुळल्या आहेत. या घरात आम्ही आमच्या लग्नाचा वाढदिवस, आई आणि मुलाचा वाढदिवस साजरा केला आहे. या घराचे इंटेरियर माझ्या एका जवळच्या मित्राने केले आहे. येथे मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते."
पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही एजाज खानच्या घराची खास झलक बघू शकता. सोबतच एजाजने आई, पत्नी आणि मुलासोबत घालवलेले खास क्षणही येथे तुम्हाला बघायला मिळतील.
सर्व फोटोः अजीत रेडेकर