आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 8: जॅकलीनसोबत थिरकला सलमान, पाहा Finaleचे काही Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान जॅकलीनसोबत डान्स करताना)
मुंबई- शनिवारी (4 जानेवारी) प्रसिध्द रिअॅलिटी शो 'बिग बॉस 8'चा फिनाले होता. यानिमित्त शोमधून एविक्ट झालेले स्पर्धक प्रणित भट्ट, उपेन पटेल. डिआंड्रा सॉरेस, आर्य बब्बर, सोना सिंह, दीपशिखा, सुकिर्ती कांडपाल आणि नताशा स्टेंकोविकसुध्दा शोमध्ये दिसले. मात्र, रेने ध्यानी आणि निगार खान फिनालेमध्ये दिसली नाही.
फिनालेच्या वेळी डिआंड्रा आणि गौतम यांचा रोमँटिक डान्सदेखील पाहायला मिळाला. तसेच, उपेनसुध्दा डिम्पी आणि करिश्मासोबत 'पीके'च्या सुपरहिट गाणे 'लव्ह इज भेस्ट ऑफ टाइम'वर डान्स केला. सलमान अभिनेत्री जॅकलीनसोबत किकच्या गाण्यांवर थिरकला. जॅकलीन आणि अर्जुन रामपाल आगामी 'रॉय' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते.
'बिग बॉस 8'चा फिनाले झाला मात्र, ग्रँड फिनाले अद्याप बाकी आहे. ग्रँड फिनाले 'हल्लाबोल' पूर्ण
झाल्यानंतर पुढील महिन्यात आयोजित केला जाणार आहे. विजेत्याची घोषणासुध्दा तेव्हाच होणार आहे. 'हल्लाबोल' सिक्वेन्स सलमानऐवजी फराह खान होस्ट करणार आहे. हा हल्लाबोल पाच स्पर्धक, करिश्मा, गौतम, प्रीतम, डिम्पी आणि अली आणि पाच चॅलेंजर्स राहूल महाजन, महक चहल, संभावना सेठ, सना खान आणि एजाज खान यांच्यात होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बिग बॉस'च्या फिनालेची छायाचित्रे...