आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'डोली अरमानों की'ने पूर्ण केले एक वर्ष, पाहा सेलिब्रेशनचे PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मालिकेच्या यशाचे सेलिब्रेशन करताना कलाकार)
मुंबईः झी टीव्हीवरील 'डोली अरमानों की' या गाजत असलेल्या मालिकेने यशस्वी एक वर्ष पूर्ण केले आहे. यानिमित्ताने शोच्या संपूर्ण कास्ट आणि क्रू मेंबर्ससाठी मुंबईत एक जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. शूटिंगमुळे काही स्टार्स पार्टीत उशीरा सहभागी झाले.
शोमध्ये सम्राटची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित मलिकने divyamarathi.comसोबत मालिकेतील आत्तापर्यंतच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, "खूप मस्त अनुभव आहे. येथे बरेच काही शिकायला मिळाले. मालिका प्रसारित व्हायला एक वर्ष पूर्ण झाले, यावर विशवास बसत नाहीये. आता कुठे एक महिना पूर्ण झाला, असे वाटत आहे. सम्राटची भूमिका साकारण्याची माझी इच्छआ नव्हती, कारण सम्राट आणि माझ्यात काहीच साम्य नाहीये. मात्र अदिती (मोहितची पत्नी)ने मला ही भूमिका स्वीकारण्यासाठी प्रेरित केले. आज या भूमिकेमुळे मी समाधानी आहे."
या मालिकेची निर्माती पर्ल ग्रे, मोहित मलिक आणि त्याची पत्नी अदिती, नेहा मर्दा, गुड्डी मारुती आणि उर्वशी ढोलकियासोबत बरेच स्टार्स या पार्टीत सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सेलिब्रेशनची खास छायाचित्रे...