आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे \'तारक मेहता...\'च्या \'दया भाभी\'च्या सख्ख्या भावाचे Posh घर! बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेत दया भाभीचा भाऊ सुंदर लालची भूमिका अभिनेता मयूर वाकाणी वठवतोय. विशेष म्हणजे मालिकेत भावाच्या भूमिकेत झळकणारा मयूर ख-या आयुष्यातसुद्धा दिशा वाकाणीचा सख्खा भाऊ आहे. ख-या आयुष्यातील ही बहीणभावाची जोडी मालिकेतसुद्धा बहीणभावाची भूमिका वठवत आहेत. दिशा आणि मयूर मुळचे अहमदाबादचे आहेत. अहमदाबादमध्ये मयूरचा थ्री बीचएअकेचे आलिशान घरे आहे. अलीकडच्या काळातच मयूरने आपले हे ड्रीम होम विकत घेतले आहे. मयूरचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर याचवर्षी दिशासुद्धा लग्नगाठीत अडकली आहे. लग्नानंतर दिशा आता मुंबईतच स्थायिक झाली आहे.

divyamarathi.com ला दिलेल्या मुलाखतीत मयूरने सांगितले, "माझ्या या घराचे संपूर्ण इंटेरिअर माझ्या चुलतभावाने केले आहे. तो व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. डोअर हँडलपासून ते बेडरुमपर्यंत सर्वकाही त्यानेच डिझाइन केले आहे. सोबतच माझी पत्नी हेमालीने घरातील इतर सजावट केली आहे. तिने आमच्या गरजांनुसार घराला सजवले आहे."

मयूर आणि हेमालीला हस्ती आणि तथ्या ही दोन मुले आहेत. मयूरचे वडील भीम वाकाणी हे प्रसिद्ध रंगभूमी कलाकार आहेत. अभिनयासोबतच भीम वाकाणी हे अहमदाबादमध्ये नाटकांचे प्रयोग लावत असतात.

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दया भाभी अर्थातच दिशा वाकाणीच्या माहेरच्या घराची खास झलक या पॅकेजमध्ये दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, मयूर वाकाणीच्या आलिशान घराची खास झलक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...