मुंबई- 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोचा शेवटचा एपिसोड 24 जानेवारीला प्रसारित केला जाणार आहे. याची शूटिंग आधीच करण्यात आली आहे. शोमध्ये गुत्थीची भूमिका साकारणारा सुनील ग्रोवर आणि मंजू शर्मा अर्थातच सुमोना चक्रवर्तीसह इतर स्टार्सने शेवटच्या एपिसोडचे काही स्टिल्स टि्वटरवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये संपूर्ण कलाकार एपिसोड एन्जॉय करताना दिसत आहे.
शेवटच्या एपिसोडमध्ये पोहोचले अक्षय कुमार-मिमृत कौर...
'कॉमेडी नाइट्स...'चा पहिला एपिसोड 22 जून 2013ला प्रसारित करण्यात आला होता. शेवटच्या एपिसोडचे शूटिंग 9 जानेवारी 2016ला झाले. यामध्ये अक्षय कुमार आणि निमृत कौर 'एअरलिफ्ट' या आगामी सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचले होते.
व्हायरल झाला शेवटच्या एपिसोडचा व्हिडिओ...
शोच्या शेवटच्या एपिसोडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये गुत्थी अर्थातच सुनील ग्रोवर भावूक झालेला दिसला. इतकेच नव्हे, जेव्हा चाहत्यांनी त्याला सिग्नेचन गाणे 'हम आए इस बगिया मे' गाण्यास सांगितले तर तो अश्रू थांबवू शकला नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शेवटच्या एपिसोडचे PHOTOS...