आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीने केला रणबीरला KISS करण्याचा प्रयत्न, दृश्य बघून लोटपोट झाली अनुष्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नकुल मेहता, भारती सिंह, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा)
मुंबईः अभिनेता रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा आपल्या आगामी 'बॉम्बे वेलवेट या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अलीकडेच 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर पोहोचले होते. येथे दोघांनीही भरपूर धमालमस्ती केली. या प्रमोशनल एपिसोडमध्ये शोची होस्ट भारती सिंहने रणबीरला किस करण्याचा प्रयत्न केला. स्टेजवरचे हे दृश्य बघून अनुष्का हसू आवरता आले नाही.
यावेळी अनुष्काने तानिया खनुजाने डिझाइन केलेला रेड, ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस कॅरी केला होता. तर रणबीर ब्लू सूटमध्ये दिसला.
'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमा येत्या 15 मे रोजी रिलीज होणार असून रणबीर-अनुष्कासह करण जोहरचीही महत्त्वपूर्ण भूमिका यामध्ये आहे. करण या शोचा परीक्षकसुद्धा आहे. करणसुद्धा रणबीर-अनुष्कासह सिनेमा प्रमोट करताना दिसला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवरची धमालमस्ती...