आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी शॉपिंगसाठी पोहोचली दीपशिखा, सिंगर पलक मुच्छाल दिसली सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः दरवर्षीप्रमाणे यंदाही छोट्या पडद्यावर दिवाळीची धूम सुरु झाली आहे. अलीकडेच टीव्ही अॅक्ट्रेस आणि बिग बॉसची एक्स कंटेस्टंट दीपशिखा नागपाल फेस्टिव मूडमध्ये दिसली. शूटिंगमधून वेळ काढून दीपशिखा आपल्या फॅमिलीसोबत शॉपिंगसाठी लोखंडवाला येथे पोहोचली. यावेळी गायिका पलक मुच्छाल तिच्यासोबत होती.
यावेळी दीपशिखाने divyamarathi.com सोबत बातचित करताना दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला. ''दिवाळीत आम्ही लोखंडावाला येथूनच शॉपिंग करतो. दरवर्षी हा परिसर अतिशय सुंदररित्या सजवण्यात येतो. मात्र यावर्षी येथे जरा जास्त गर्दी दिसतेय. म्हणून मी सकाळी शॉपिंग केले.''
लोखंडवाला सोसायटीच्या मेंबर्सनी स्वच्छ भारत अभिनयाअंतर्गत कँपेन सुरु केला आहे. यामध्ये दिपशिखादेखील सहभागी झाली आहे. ती म्हणते, प्लीज फटाके उडवू नका. याऐवजी एखाद्या गरीबाला मदत करा. दिवे लावा, मिठाई वाटा, मात्र प्रदुषण करु नका.
या सकारात्मक संदेशासोबतच दीपशिखाने divyamarathi.comच्या वाचकांना दिवाळीच्या शूभेच्छा दिल्या आहेत.
पुढे पाहा, दीपशिखा आणि पलकची क्लिक झालेली छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...