आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Ronit Pallavi Celebrates 100 Episodes Of \'Itna Karo Na Mujhe Pyaar\'

\'इतना करो ना..\'ने पूर्ण केले 100 एपिसोड्स, \'रागिनी-नील\'ने केक कापून केले सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पल्लवी कुलकर्णी, रोनित रॉय)
मुंबई- सोनी टीव्हीच्या 'इतना करो ना मुझे प्यार' या प्रसिध्द शोने 100 एपिसोड पूर्ण केले. यानिमित्त शोचे मुख्य कलाकार पल्लवी कुलकर्णी (रागिनी) आणि रोनित रॉय (नचिकेत अर्थातच नील)ने टीमसोबत केक कापून सेलिब्रेशन केले. दोघांनी रोमँटिक डान्सची एक झलकसुध्दा दाखवली. या सेलिब्रेशनमध्ये पल्लवी आणि रोनित यांच्यासोबत अविनाश मुखर्जी, यतिन मेहरा आणि स्नेहल पांडेसुध्दा उपस्थित होते.
शोने 100 एपिसोड पूर्ण केले असले तरी या 100 एपिसोड्समध्ये मालिका एकाच ट्रॅकवर सुरु आहे. नील आणि रागिनी यांच्यातील गैरसमजच आतापर्यंत या मालिकेत दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे चांगली स्टारकास्ट असूनसुध्दा ही मालिके टीआरपीपासून दूर आहे.
सोनी एंटरटेन्मेंटचा हा शो एका घटस्फोटीत जोडीच्या कथेवर आधारित आहे. शोमध्ये रोहित डॉ. नचिकेत खन्ना नावाच्या एका सर्जनच्या भूमिकेत असून पल्लवी कुलकर्णी त्याची पत्नी रागिनी पटेलची भूमिका साकारत आहे. दोघांचा घटस्फोट झाला असूनदेखील आपल्या मुलांसाठी सोबत राहतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 100 एपिसोड्सचे सेलिब्रेशन करताना या मालिकेच्या टीम मेंबर्सची छायाचित्रे...