आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Saif Katrina Promotes 'Phantom' On The Sets Of 'Indian Idol Junior 2'

'इंडियन आयडॉल'च्या सेटवर सैफचे बर्थडे सेलिब्रेशन, कतरिनासोबत केले फँटमचे प्रमोशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सैफ अली खान, सोनाक्षी सिन्हा, सलीम मर्चेंट, विशाल ददलानी आणि कतरिना कैफ - Divya Marathi
फोटो - सैफ अली खान, सोनाक्षी सिन्हा, सलीम मर्चेंट, विशाल ददलानी आणि कतरिना कैफ

मुंबईः रविवारी अभिनेता सैफ अली खान आणि कतरिना कैफ त्यांच्या आगामी 'फँटम' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने इंडियन आयडॉल ज्युनिअरच्या सेटवर पोहोचले. विशेष म्हणजे याच दिवशी सैफचा 45 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने सैफने शोच्या सेटवर बर्थडे केक कापला.
शोची जज सोनाक्षी सिन्हाने सेटवरील एक छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. फोटोत सोनाक्षी, सैफ अली खान, जज विशाल ददलानी आणि जज सलीम मर्चंटसोबत पोज देताना दिसते. कॅप्शनमध्ये सोनाक्षीने लिहिले, "Happy happy birthday Saif!!! It was one big birthday party on the set of #indianidoljr today! #birthdayboy #phantom"
टीम 'फँटम'ने सेटवर तिन्ही जजेस सोनाक्षी, विशाल ददलानी आणि सलीम मर्चंट यांच्यासोबत क्वॉलिटी वेळ घालवला. कतरिना आणि सैफने छोट्या स्पर्धकांसोबत भरपूर धमालमस्ती केली. येथे कतरिनाने ताल धरला तर सैफ गिटार वाजवताना दिसला. इंडियन आयडॉल ज्युनिअरच्या सेटवर सोनाक्षीची आई पूनम सिन्हा यांनीही उपस्थिती लावली होती.
कबीर खान दिग्दर्शित 'फँटम' हा सिनेमा सैफ आणि कतरिना अॅक्शन अवतारमध्ये दिसणार असून येत्या 28 ऑगस्टला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'इंडियन आयडॉल ज्युनिअर'च्या सेटवर क्लिक झालेली स्टार्सची खास झलक...