(भारती सिंह, दिग्दर्शक रेमो डिसुजा, वरुण धवन)
मुंबईः अभिनेता वरुण धवन सध्या आपल्या आगामी 'एबीसीडी 2' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अलीकडेच प्रमोशनच्या निमित्ताने त्याने 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या मंचावर हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शक रेमो डिसुजासुद्धा आले होते. 'IGT' च्या सेटवर शोची होस्ट भारती रेमोसोबत धमाल करताना दिसली. भारती, रेमोची गमतीने छेड काढताना दिसली.
'एबीसीडी 2' या डान्स बेस्ड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या शोमध्ये आलेल्या वरुण आणि रेमो यांनी आपल्या दमदार नृत्याची झलकसुद्धा दाखवली. शोचे जज करण जोहर, किरण खेर आणि मलायका अरोरा खान यांच्यासोबत हे दोघेही क्वॉलिटी वेळ घालवताना दिसले.
'एबीसीडी 2' हा सिनेमा 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'एबीसीडी' या सिनेमाचा सिक्वेल आहे. वरुण-श्रद्धा यांच्यासह सिनेमात प्रभूदेवा आणि लॉरेन गॉटलिएब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. रेमो डिसुजा दिग्दर्शित हा सिनेमा 19 जून रोजी रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रमोशनच्या निमित्ताने 'IGT'च्या सेटवर पोहोचलेल्या वरुण धवन आणि रेमो डिसुजाची छायाचित्रे...