(सुमोना चक्रवर्ती, उपासना सिंह, अली अजगर, अर्शद वारसी आणि सुनील ग्रोवर)
मुंबई- 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या आगामी एपिसोडला अभिनेता अर्शद वारसी होस्ट करताना दिसणार आहे.
कपिल शर्माऐवजी अर्शद वारसी येत्या एपिसोडमध्ये झळकणार आहे. सेटवरील काही फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये अर्शद बिट्टू शर्माचे कुटुंबीयांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.
शोशी निगडीत सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'आगामी एपिसोडमध्ये कुटुंबीयांमुळे त्रस्त बिट्टी शर्मा (कपिल शर्मा) एका पत्र लिहून घर सोडून जातो. शर्माचे कुटुंबीय मंजू (सुमोना चक्रवर्ती), बुआ (उपासना सिंह), कपिलचे सासरे (सुनील ग्रोवर) देवाकडे त्याला परत पाठवण्यासाठी प्राथर्ना करतात. त्यावेळी देवाच्या अवतारात अर्शद वारसीची एंट्री होते.'
येत्या या एपिसोडमध्ये 'दृश्यम' प्रमोट करण्यासाठी अजय देवगण, तब्बू आणि श्रेया सरनसुध्दा शोमध्ये दिसणार आहे. अर्शद या सर्वा स्टार्ससोबत मस्ती करताना आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
'कॉमेडी नाइट्स...'चा होस्ट कपिल शर्मा आजारपणामुळे काही एपिसोड्स होस्ट करू शकणार नाहीये. त्यामुळे कपिलऐवजी अर्शद वारसी, करण जोहर, साजिद खानसारखे सेलिब्रिटी शो होस्ट करणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'कॉमेडी नाइट्स...'चे On Location Photos...