आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारतातील अंबा, कुंती आणि द्रौपदी, पाहा सक्सेस बॅशमधील स्टारकास्टचा खास अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, महाभारतातील अंबा उर्फ रतन राजपूत, कुंती उर्फ शफक नाज आणि द्रौपदी उर्फ पूजा शर्मा)
 
मुंबई - स्टार प्लस वाहिनीवरील गाजत असलेल्या \'महाभारत\' या पौराणिक मालिकेचा शेवटचा भाग 16 ऑगस्ट रोजी प्रसारित झाला. या मालिकेला मिळालेले यशामुळे निर्माता-दिग्दर्शकासह संपूर्ण स्टारकास्ट आनंदी आहे. 
 
हा आनंद साजरा करण्यासाठी अलीकडेच मुंबईत सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सौरभ राज जैन, शाहिर शेख, पूजा शर्मा, अहम शर्मा, अरव चौधरी, प्रणीत भट्ट, सौरव गुर्जर, अर्पित रंका, विन राणा, लावण्य भारद्वाज, निर्भय वाधवा, पल्लवी सुभा, रतन राजपूत, निसार खान, अनूप सिंह यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम हजर होती. 
 
याशिवाय सलीम खान (लेखक), अनुराग ठाकुर (भाजप लीडर), सिद्धार्थ आनंद (\'महाभारत\'चे दिग्दर्शक), अनुरुद्ध दवे (टीव्ही अभिनेता), सुष्मिता मुखर्जी (टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री) यांच्यासह टीव्ही-सिनेमा जगतातील अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. महाभारत या मालिकेचा पहिला भाग 16 सप्टेंबर 2013 रोजी प्रसारित करण्यात आला होता. 
 
पुढील स्लाईड्समध्ये पाहा \'महाभारत\' या मालिकेच्या सक्सेस बॅशमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...