आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pics Of Very Grand And Lavish Set Of Serial Mahabharat

120 कोटींत तयार झाले \'महाभारत\', 10 एकरात पसरला आहे भव्य सेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 सप्टेंबर 2013 पासून छोट्या पडद्यावर 'महाभारत' सुरु झाले आहे. सिद्धार्थ तिवारी दिग्दर्शित या कार्यक्रमाची निर्मिती स्वस्तिक कंपनीने केली आहे. बी. आर. चोप्रा यांनी जवळपास तीस वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर 'महाभारत' सुरु केले होते. त्याकाळी त्यांची ही मालिका सुपरहिट ठरली होती. त्याकाळी दूरदर्शन प्ररासित होणा-या या मालिकेची कथा राही मासून रजाने लिहिली होती.
आता नव्याने सुरु झालेली 'महाभारत' ही मालिका लोकप्रिय करण्याठी निर्मात्यांनी कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाहीये. या मालिकेत कृष्णाची भूमिका सौरभ राज जैन या अभिनेत्याने साकारली आहे. तर अर्जुनच्या भूमिकेत शाहीर शेख, युधिष्ठिरच्या भूमिकेत रोहित भारद्वाज, भीमच्या भूमिकेत सौरव गुर्जर, दुर्योधनच्या भूमिकेत अर्पित रंका, शकूनिच्या भूमिकेत पुनीत भट्ट, पितामहच्या भूमिकेत अरव चौधरी, धृतराष्ट्रच्या भूमिकेत अनुप सिंह, कुंतीच्या भूमिकेत शफख नाज आणि कर्णच्या भूमिकेत अहम शर्मा हे कलाकार दिसत आहे.
कलाकारांच्या दमदार अभिनयासोबतच प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे या मालिकेचा भव्य-दिव्य सेट. 'महाभारत'चा सेट, स्टारकास्ट आणि कॉश्च्युम डिझाईनवर भरपूर मेहनत घेतली जात आहे. महाभारताचा राजेशाही थाट दाखवण्यासाठी एका भव्य दिव्य सेटची निर्मिती करण्यात आली आहे. गुजरातमधील उमरगांव येथे दहा एकर क्षेत्रात 'महाभारत'चा भव्य दिव्य सेट उभारण्यात आला आहे. हा सेट कलादिग्दर्शक ओमुंग कुमार यांनी डिझाईन केला आहे.
भारत आणि परदेशात शूटिंग...
वेदव्यास यांच्या महाकाव्यावर आधारित 'महाभारत' या मालिकेचे शुटिंग देश आणि विदेशातील अनेक नयनरम्य आणि ठिकाणी करण्यात आले आहे. काश्मिर, राजस्थानमधील जयपूर आणि जैसलमेर, गुजरातमधील अहमदाबाद, मध्य प्रदेशातील बेळाघाट, श्रीलंका आणि नेपाळमधील अनेक ठिकाणी मालिकेचे चित्रीकरण पार पडले आहे. याशिवाय नेपाळ आणि श्रीलंकेतही मालिकेचे काही भाग चित्रीत करण्यात आले आहेत. महाभारतचा सेट उभा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्याची बातमी होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सेटच्या निर्मितीचा एकुण खर्च 120 कोटी इतका आहे.
ग्राफिक्सवर 200 लोकांची टीम करतेय काम...
महाभारतच्या क्रिएटिव्ह आणि प्रॉडक्शन टीममध्ये जवळपास 400 लोक काम करत आहेत. यापैकी 200 जण केवळ ग्राफिक्सवर काम करत आहेत. खरं तर असे सेट अधिक भव्य दिव्य दिसण्यासाठी ग्राफिक्सचा मोठा वापर करण्यात येतो. दिग्दर्शक सिद्धार्थ तिवारी यांनी महाभारतमध्ये व्हिज्युअल इफेक्ट आणि थ्रीडीचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सेटची खास छायाचित्रे...