आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा काही मिनिटांत कसा बेचिराख झाला 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'चा सेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कलर्स वाहिनीवर प्रसारित होणा-या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या लोकप्रिय मालिकेच्या सेटला बुधवारी सकाळी आठच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण सेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गोरेगाव फिल्मसिटीत 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'चा सेट उभारण्यात आला होता.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


बुधवारी संध्याकाळी या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. त्यामुळे लाईटमन, स्पॉट बॉय सेटवर हजर होते. सेटवर काम सुरु असताना त्याच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला आणि सेटला आग लागली. काही क्षणांतच संपूर्ण सेटवर आग पसरली. या आगीत 20 ते 22 कोटींचे नुकसान झाल्याचे समजते.

बघा बेचिराख झालेल्या सेटची छायाचित्रे...