आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो चालकाचा मुलगा ठरला होता 'झलक'च्या 8 पर्वाचा विजेता, बघा घराचे Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई आणि बहिणीसोबत फैजल. - Divya Marathi
आई आणि बहिणीसोबत फैजल.
मुंबई- 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोच्या नवव्या पर्वात कोरिओग्राफर फराह खान चौथ्या परिक्षकाच्या रुपात झळकणारेय. याची माहिती स्वतः फराहने ट्विट करुन दिली. तिने ट्विट केले, "झलक दिखला जा 9साठी करण जोहर, मनीष पॉल, जॅकलिन आणि गणेशसोबत पहिल्या दिवसाचे शूटिंग."
फैजल खान ठरला होता झलकच्या आठव्या पर्वाचा विजेता...
झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोच्या आठव्या पर्वाचा फैजल खान विजेता ठरला होता. 16 वर्षीय फैजल खानने सनाया ईराणी, शमिता शेट्टी आणि मोहित मलिक यांना मागे टाकत झलकचा किताब आपल्या नावी केला आहे. 30 जानेवारी 1999 रोजी जन्मलेला फैजल डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर्स 2 चा विजेता आहे. 2012 मध्ये लिटील मास्टरचा किताब आपल्या नावी केल्यानंतर फैजल 'डान्स के सुपरकिड्स' (2012), 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' (2013) या शोमध्ये झळकला.
2013-2014 या काळात छोट्या पडद्यावर प्रसारित झालेल्या 'भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप' या मालिकेत लीड रोल साकारला. हा शो लोकप्रिय ठरला आणि फैजलने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
फैजलने काही महिन्यांपूर्वीच मुंबईत नवीन फ्लॅट खरेदी केला. फैजलचे वडील ऑटो चालवतात. आतापर्यंत त्यांच्या मालकीचा मुंबईत फ्लॅट नव्हता. तो मुंबईत आजीसोबत राहत होता. त्याच्या कठोर परिश्रमाला अखेर यश मिळाले. मुंबईसारख्या महागड्या शहरात त्याला फ्लॅट विकत घेता आला. 2012 मध्ये फैजलने डान्सिंग रिअॅलिटी शो 'डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर'चा दुसरा सीजन जिंकला होता. त्यानंतर त्याने मागे वळून बघितले नाही. आता तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे. त्याच्याशी आम्ही केलेली बातचित...

स्वतःचा फ्लॅट केला खरेदी
दोन महिन्यांपूर्वी आम्ही या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. हा वनबिएचके फ्लॅट आहे. विशेष म्हणजे आम्ही 15 व्या मजल्यावर राहतो. माझ्यासाठी हा फ्लॅट विशेष आहे. मुंबईसारख्या शहरात फ्लॅट विकत घेणे काही सोपी गोष्ट नाही. यापूर्वी मी आजीच्या घरी राहत होतो. आमचे स्वतःचे घर नव्हते. मला माझा अभिमान आहे, की मी मेहनतीच्या बळावर माझ्या पालकांचे स्वप्न पुर्ण केले आहे.

फ्लॅटच्या गॅलरीबाबत
मला माझ्या फ्लॅटची गॅलरी खुप आवडते. येथून मुंबई अगदी लहान दिसते. पावसाळा आणि हिवाळ्याची मी अत्यंत आतुरतेने वाट बघत आहे. हे ऋतू या घरात मला अनुभवायचे आहेत. 15 व्या मजल्यावरुन पावसाळ्यात अत्यंत रम्य चित्र दिसत असेल याचा मला विश्वास आहे. मला फोटोग्राफीही आवडते. अशा वेळी मला सुर्योद्य कॅमेऱ्यात टिपायचा आहे.

इंटेरिअर डिझायनिंगवर
या फ्लॅटचे कलर कॉम्बिनेशन मी डिसाईड केले आहे. संपूर्ण घराला ऑफ व्हाईट आणि लॅव्हेंडर कलरने पेंट केले आहे. मी कुठे तरी वाचले आहे, की लॅव्हेंडर कलरने मनात सकारात्मक भावना येते. सुरवातीला मला घराला ऑरेंज कलर द्यायचा होता. पण तो फार डार्क दिसला असता. त्यामुळे मी लाईट आणि पॉझिटिव्ह कलरची निवड केली आहे. घर सजवण्यासाठी मला इंटेरिअर डिझायनर हायर करायचा नव्हता. माझ्या घरच्यांनीच इंटेरिअर तयार केले आहे.

पुढील स्लाईडवर बघा, फैजल खानच्या फ्लॅटचे फोटो...

सर्व फोटोः अजीत रेडेकर

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.) ​
बातम्या आणखी आहेत...