आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बुवा’च्या Life मधील शॉकिंग खुलासा : 4 वर्षांपासून नव-यापासून आहे वेगळी, आता घेणार काडीमोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपासना सिंह आणि नीरज भारद्वाज - Divya Marathi
उपासना सिंह आणि नीरज भारद्वाज
‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमुळे घराघरात पोहचलेली ‘बुवा’ म्हणजे अभिनेत्री उपासना सिंगच्या वैयक्तिक आयुष्यात आलेलं वादळ शमताना दिसत नाहीये. पती नीरज भारद्वाजपासून उपासना घटस्फोट घेणार असल्याची बातमी आहे. उपासना 2009मध्ये अभिनेता नीरज भारद्वाजसोबत विवाह केला होता. पण आता या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षांपासून हे दोघे वेगळे राहत आहेत. आता फक्त कागदपत्रांवरच त्यांचे नाते संपुष्टात येणे बाकी आहे. ‘बॉम्बे टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, दोघांनीही आपल्या अटींवर वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. नऊ महिन्यांपासून बोलणेही बंद..
गेल्या नऊ महिन्यांपासून दोघंही एकमेकांच्या संपर्कात नाहीत. दोघांनीही आपले लग्न टिकून राहावे यासाठी प्रयत्न केला, पण दोघांमध्ये असलेले मतभेद मात्र संपू शकले नाही. एकमेकांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असणं आणि त्या पूर्ण न करु शकणे हे त्यांचे वेगळे होण्याचे कारण आहे.

उपासना म्हणाली, 'नो कमेंट', तर नीरजने केले स्पष्ट
‘साथ निभाना साथिया’मध्ये चिराग मोदी ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता नीरजने या बातमीला विरोध केला नाही. तो म्हणाले की, मी तिच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही. यामुळेच आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेत आहोत. उपासनाला आता माझी गरज नाही आणि मीही तिला थांबवणार नाही. उपासना आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे पण आमच्यात यावरुन वाद नाहीत. नीरजने सांगितले की, आम्ही अनेकदा आमच्यातले वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही एकमेकांसाठी बनलोच नाही असे वाटते. दिवाळीनंतर आम्ही घटस्फोटासाठी अर्ज करणार आहोत.

उपासनाने मात्र या विषयावर बोलण्यास नकार दिला. ती म्हणाली, ही माझी खासगी गोष्ट आहे. मी मीडियाला यामध्ये येऊ देणार नाही. लोकांसमोर मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल काहीही बोलणार नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, उपासना आणि नीरज यांच्या लग्न आणि रिसेप्शनचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...