आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss फेम दीपशिखाची तक्रार, 'नव-याने दिली जीवे मारण्याची धमकी'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः दीपशिखा नागपाल आणि केशव अरोरा)
मुंबईः 'बिग बॉस'च्या गेल्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री दीपशिखा नागपालने तिचा पती केशव अरोराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने आपल्या नव-यावर गंभीर आरोप करत कुटुंबासाठी सुरक्षेची मागणी केली आहे. एका इंग्रजी वेबसाइटने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, केशव अरोराने दीपशिखा आणि तिच्या दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दीपशिखाने मुलाखतीत सांगितले, की सध्या मी ज्या परिस्थितीचा सामना करतेय, ते कुणीही समजू शकत नाही.
दीपशिखाने 2012मध्ये केशव अरोरासोबत लग्न केले होते. हे तिचे दुसरे तर केशवचे पहिले लग्न होते. यापूर्वी 1997 मध्ये दीपशिखाने मल्याळम आणि हिंदी सिनेअभिनेता उपेंद्रसोबत लग्न केले होते. मात्र 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दीपशिखाला पहिल्या लग्नापासून एक मुलगी आणि एक मुलगा आहे. वेधिका उपेंद्र हे मुलीचे तर विवान उपेंद्र हे तिच्या मुलाचे नाव आहे.
दीपशिखाचा दुसरा पती केशव मॉडेल आणि अभिनेता आहे. 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'ये दुरियाँ' या सिनेमात तो झळकला होता. विशेष म्हणजे दीपशिखाच या सिनेमाची दिग्दर्शिका, निर्माती आणि प्रमुख अभिनेत्री होती. दीपशिखाने 'कोयला' (1997), 'बादशाह' (1999),'रिश्ते' (2002), 'पार्टनर'(2007) आणि 'गांधी टू हिटलर' (2011) या सिनेमांमध्ये काम केले आहे. लीड अॅक्ट्रेस म्हणून ये दुरियाँ हा तिचा पहिला सिनेमा होता.
डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये नव-यासोबत झळकली
दीपशिखा आणि केशव 2013 मध्ये 'नच बलिए' या डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. मात्र फार काळ ते या शोमध्ये टिकू शकले नव्हतेय
पुढे पाहा. दीपशिखाची पती आणि मुलांसोबतची निवडक छायाचित्रे...