आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Records Rahul Raj Singh's Ex Girlfriend's Statement In Pratyusha Banerjee's Death Case

Ex-गर्लफ्रेंड म्हणाली, 'प्रत्युषामुळे माझ्या आणि राहुलच्या नात्यात निर्माण झाली कटुता'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल राज सिंह, सलोनी शर्मा आणि प्रत्युषा बॅनर्जी (L-R) - Divya Marathi
राहुल राज सिंह, सलोनी शर्मा आणि प्रत्युषा बॅनर्जी (L-R)
मुंबई: प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात दररोज काही ना काही खुलासे होत आहेत. आता प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहची एक्स-गर्लफ्रेंड सलोनी नवीन खुलासा केला आहे. सलोनी सांगितले, की प्रत्युषामुळे तिच्या आणि राहुलच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती.
पोलिसांनी आतापर्यंत 15 लोकांचे जबाब नोंदवले...
- या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 15 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात प्रत्युषा आणि राहुलचे आई-वडील, नातेवाईक, फ्रेंड्स आणि सोसायटीतील लोक आणि प्रत्युषाची मोलकरीण सामील आहे.
- यादरम्यान अनेक लोकांनी सलोनी शर्माचे नाव घेतले आहे. काहींनी असेही सांगितले, की सलोनी नेहमी प्रत्युषाच्या फ्लॅटवर येऊन राहुल आणि तिला शिवीगाळ करत होती.
- शनिवारी (9 एप्रिल) दुपारी बंगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये सलोनीला बोलावण्यात आले. येथील इन्स्पेक्टर दीपक फतंगारे यांनी तिचा जबाब नोंदवला.
- जबाबात सलोनी सांगितले, की ती चार वर्षांपासून प्रत्युषाची मैत्रीण होती. सलोनीच्या सांगण्यानुसार, 'प्रत्युषा कधीकाळी माझी चांगली मैत्रीण होती. परंतु तिच्यामुळे माझ्यात आणि राहुलमध्ये दूरावा निर्माण झाला होता. प्रत्युषामुळे माझ्या आणि राहुलच्या नात्यात कटुता आली होती.'
कोण आहे सलोनी शर्मा?
- कोलकात्यात जन्मलेली आणि लहानाची मोठी झालेली सलोनी शर्मा मुंबईमध्ये अभिनेत्री होण्यासाठी आली आहे. तिला पहिला ब्रेक 'फिरंगी बहू'मधून मिळाला. या मालिकेत ती नकारात्मक भूमिका साकारत होती.
- याशिवाय, तिने 'आहट'मध्ये कॅमियो केले आहे. सध्या ती 'संतोषी मां' मालिकेत प्रियाची भूमिका साकारत आहे.
काय आहेत सलोनीवर आरोप?
- प्रत्युषाने आत्महत्येचे पाऊल राहुलकडून मिळालेल्या धोक्यामुळे उचलल्याचे सांगितले जात आहे.
- सूत्रांच्या सांगण्यानुसार, राहुलचे सलोनी शर्मा नावाच्या अभिनेत्रीसोबत अफेअर चालू होते. मात्र, स्वत: सलोनी यांचे खंडन केले होते.
- divyamarathi.comसोबत बातचीत करताना सलोनी म्हणाली होती, 'माझे या प्रकरणाशी काही एक घेण देणे नाहीये. मला माहित नाही, लोक माझे नाव का घेताय. मी कधीच प्रत्युषासोबत बोलले नाही.'
- 'सर्व आरोप निरर्थक आहेत. हे राहुल आणि प्रत्युषा यांचे प्रकरण आहे, माझे याच्याशी काही संबंध नाहीये. मी कधीच त्याच्यासोबत सामील झाले नाही. हे खोटे आहे, की मी राहुलला डेट करतेय.''
सलोनी आणि राहुलच्या नात्याविषयी अनेकांना आहे माहिती...
- सलोनी आणि राहुल यांच्या नात्याविषयी इंडस्ट्रीत अनेक लोकांना ठाऊक आहे.
- एका मुलाखतीदरम्यान डॉली बिंद्राने सांगितले होते, 'राहुल सलोनी शर्मा नावाच्या तरुणीच्या संपर्कात आहे.
- त्याचे प्रत्युषासोबत होणा-या वादाचे हेच कारण असावे. इंडस्ट्रीसाठी ही खूपच शॉकिंग बातमी आहे.'
काय आहे प्रकरण?
- 1 एप्रिलला 'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जीने गोरेगाव येथील राहत्या घरी पंख्याला फाशी घेऊन आत्महत्या केली. राहुलने तिला कांदिवली स्थित कोकिलाबेन रुग्णालयात नेले होते. येथे डॉक्टर्सनी तिला मृत घोषित केले.
- 3 एप्रिलला राहुलच्या छातीत वेदना होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जी यांनी बंगुर नगर पोलिस ठाण्यात FIR दाखल केली. त्यानंतर राहुलवर भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे), 504 (जाणूबुजून भडकावणे, भावना दुखावणे), 506 (धमक्या देणे) आणि 323 (मारहाण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- 7 एप्रिलला राहुलने अटकपूर्व जामीनासाठी याचिका दिनदोशी सत्र न्यायालयात दाखल केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. आता ही याचिका हायकोर्टात आहे.
- पोलिस राहुलच्या डिस्चार्जची प्रतिक्षा करत आहेत. त्यानंतर त्याला ताब्यात घेता येईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलोनी शर्माचे PHOTOS...