आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'चंद्र नंदिनी'च्या अॅक्ट्रेसने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर शेअर केला वेडिंग अल्बम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'क्राइम पेट्रोल' आणि 'द अॅडव्हेंचरस ऑफ हातिम' या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री पूजा बॅनर्जीने अलीकडेच तिच्या लग्नाचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हळदी, मेंदी आणि लग्न विधींच्या फोटोजचा यामध्ये समावेश आहे. पूजाचे लग्न नॅशनल स्विमर संदीप सेजवालसोबत झाले आहे. यावर्षी 28 फेब्रुवारी रोजी हे कपल लग्नाच्या बेडीत अडकले. 

पूजाच्या लग्नात झाले होते पाच कार्यक्रम... 
- मीडियाला दिलेल्या मुलाखतीत पूजाने सांगितले होते, की तिच्या लग्नाचे एकुण पाच कार्यक्रम (मेंदी, हळद, बॅचलर्स ईव्ह, वेडिंग आणि रिसेप्शन) झाले होते.। 
- पूजाने सर्व सेरेमनीमध्ये वेगवेगळे ड्रेस परिधान केले होते. हळदीच्या कार्यक्रमासाठी खास बांग्लादेशातून तिच्यासाठी साडी आणण्यात आली होती. मेंदी कार्यक्रमात तिने दादरच्या काज्बींच्या आउटफिटला पसंती दिली. तर एका लग्नविधीसाठी तिने कोलकाताहून आलेली बनारसी जरदोजी साडी परिधान केले होते. लग्नासाठी पूजाचा ड्रेस दिल्ली बेस्ड डिझायनर SFBazaar यांनी डिझाइन केला होता. मुंबई आणि नागपूर येथून तिच्यासाठी ज्वेलरी आली होती.

'चंद्र नंदिनी' मालिकेत झळकत आहे पूजा...
- छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या 'चंद्र नंदिनी' या मालिकेत पूजा निगेटिव्ह भूमिकेत दिसत आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, पूजा आणि संदीपच्या लग्नाचे 12 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...