आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pooja Bedi Called Wicked Witch For New Step Mother

वडिलांच्या चौथ्या लग्नाने नाराज आहे पूजा बेदी, सावत्र आईला म्हटले 'डायन'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून, पूजा बेदी, कबीर बेदी आणि परवीन दुसांज - Divya Marathi
डावीकडून, पूजा बेदी, कबीर बेदी आणि परवीन दुसांज
मुंबई- कबीर बेदीच्या चौथ्या लग्नामुळे नाराज असलेली त्यांची मुलगी पूजा बेदीने आपल्या नवीन सावत्र आईविषयी 'डायन' शब्द वापरला आहे. पूजाने टि्वट करून म्हटले, 'प्रत्येक कथेत एक डायन किंवा दुष्ट आई असते. माझी आत्ता आली. कबीर बेदीने परवीन दुसांज सोबत लग्न केले आहे.' पूजा कबीर आणि त्याची पहिली पत्नी प्रोतिमाची मुलगी आहे.
2013मध्ये पूजाने कबीर आणि परवीनला म्हटले होते घर खाली करा...
पूजाच्या सांगण्यानुसार, मला वडील आणि त्यांची गर्लफ्रेंड परवीनच्या नात्याला सपोर्ट करणे शक्य नव्हते. 2013मध्ये एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला होता. यावेळी पूजाने कबीर आणि परवीनला तिच्या आईचा फ्लॅट खाली करण्याससुध्दा सांगितले होते. मीडियासोबत बातचीत करताना तिने सांगितले होते, 'घटस्फोटानंतर सिंगल मदर बनून मुले सांभळण्यासाठी हा फ्लॅट माझ्या कमाईचे माध्यम आहे. म्हणून वडील आणि त्यांच्या गर्लफ्रेंडचे नाते मला स्वीकार करणे अशक्य होते.'
आणखी काय म्हणाली होती पूजा?
पूजाने या मुलाखतीत सांगितले होते, की माझ्याविषयी कुणी काहीही बोलू नये आणि माझ्या घराला टेकओव्हर करण्यासाठी भांडण करू नये, अशी माझी इच्छा होती. पापा चांगले कमावतात, म्हणून त्यांनी परवीन आणि त्यांची बहीण सुकीसोबत नवीन घरी जावे. यादरम्यान पूजाने एक सर्टिफिकेट सादर केले होते. त्यामध्ये 1977मध्ये जुहू स्थित फ्लॅटची मालकीन तिची आई प्रोतिमा आणि 1995मध्ये स्वत: पूजा बेदी होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कबीर आणि परवीनसोबतचे पूजा बेदीचे काही PHOTOS...