आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'महादेवा'ची 'पार्वती' 'झलक दिखला जा'मध्ये बनली डान्सर, पाहा तिचे ग्लॅमरस PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: लाइफ ओके या चॅनलवर प्रसारित होणारी 'देवो के देव महादेव' मालिकेची पार्वती अर्थातच पूजा बोस सध्या कलर्सच्या डान्सिंग शो 'झलक दिखला जा'मध्ये एक स्पर्धक म्हणून झळकत आहे. एकिकडे ती डान्स करून आपला बिनधास्त अंदाज दाखवत आहे तर दुसरीकडे सोज्वल अभिनयाने लोकांना भूरळ घालत आहे.
राजस्थानची तरुणी आहे पूजा:
पूजा तिच्या नावाने बंगाली बाला वाटते मात्र तिचा जन्म जयपूर, राजस्थानमध्ये झाला. सध्या ती मुंबईमध्ये राहत आहे. अभिनयासह ती मॉडेलिंगमध्येसुध्दा करिअर करत आहे. तिला टीव्हीवर खरी ओळख 'तुझ संग प्रीत लगाई सजना'मधून मिळाली. त्यानंतर 'देवो के देव महादेव' या मालिकेमधूनही तिला बरीच प्रसिध्दी मिळाली.
टीव्हीवर पहिले पाऊल
पूजाला 'तुझ संग प्रीत लगाई सजना' आणि 'देवो के देव महादेव' या मालिकांमधून लोकप्रियता जरूर मिळाली. परंतु तिने टीव्हीवर पहिले पाऊल एकता कपूरच्या 'कहानी हमारे महाभारत की' या मालिकेमधून ठेवले. या मालिकेत ती कृष्णाची प्रेयसी राधाच्या रुपात झळकली होती. पण टीव्हीवर या मालिकेला यश प्राप्त झाले नाही आणि चार महिन्यांमध्येच शो बंद पडला. ती इमेजिन टीव्हीच्या 'सर्वगुण संपन्न' मालिकेतसुध्दा दिसली आहे.
फिल्मी करिअर
पूजाला टीव्ही शोमध्ये प्रसिध्दी मिळाली तसेच तिने बंगाली सिनेमांमध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'माचो मस्ताना' (2012), 'चॅलेंज-2' (2013), 'लवरिया' (2013) आणि 'तीन पत्ती' (2014)सारख्या बंगाली सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. तिने एका तेलगू सिनेमामध्येही काम केले आहे. तसेच लिएंडर पेससह 'राजधानी एक्स्प्रेस' (2013) या हिंदी सिनेमामध्ये ती झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा 'देवो के देव महादेव'ची पार्वती अर्थातच पूजा बोसची निवडक छायाचित्रे...
(सर्व छायाचित्रे पूजा बोसच्या फेसबुक आणि टि्वटर अकाउंटच्या आधारे घेण्यात आली आहे.)