आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: 52 वर्षांच्या झाल्या पूनम ढिल्लन, सेटवर मिळाली सरप्राइज बर्थ डे पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द अभिनेत्री पूनम ढिल्लन आज 52 वर्षांच्या झाल्या आहेत. 70-80 दशकांत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये दिसलेल्या पूनम सध्या सोनी एंटरटेनमेन्ट चॅनलच्या 'एक नई पहचान' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत एका अशिक्षित महिलेची भूमिका साकारताना दिसत आहेत.
शोच्या सेटवर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शोच्या आगामी एपिसोडची शुटिंग चालू होते. शुटिंग पूर्ण होताच स्टार्सनी पूनम यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देऊन एक सरप्राइझ दिले.
पूनम यांनी बर्थ डे केक कापला आणि सर्वांनी पार्टीला एन्जॉय केले. यावेळी पूनम यांच्याव्यतिरिक्त क्रिस्टल डिसूजा, करण शर्मा आणि रीता भादुडीसह शोचे इतर कलाकार उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या सरप्राइझ बर्थ डे पार्टीची काही खास छायाचित्रे...